Sanjay Daine : निःशब्द...! वडिलांवर अंत्यसंस्कार करून 'साहेब' परत ऑन इलेक्शन ड्यूटी

Gadchiroli Loksabha : गडचिरोली हा आदिवासीबहुल भाग आहे. स्थानिक आदिवासी भाषेतच सगळे व्यवहार चालतात. मात्र, प्रशासनाने स्थानिक भाषेत मतदानविषयी जागृती करत लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.
Sanjay Daine
Sanjay Dainesarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी (ता.19) पार पडले. महाराष्ट्रामध्ये विदर्भातील पाच जागांसाठी 55 टक्के मतदान झाले. मात्र, यामध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 66 टक्के मतदान झाले. प्रशासकीय यंत्रणांनी मतदान जागृती केल्याचा हा परिणाम आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते.

Sanjay Daine
Pratibha Dhanorkar News: नशिबात असतं ते होतंच! बाळू धानोरकरांच्या आठवणींनी प्रतिभाताई भावूक

जिल्हाधिकारी (collector) दैने यांच्या वडिलांचे 15 एप्रिलला निधन झाले. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर दैने लवकरच 17 एप्रिलला कर्तव्यावर हजर झाले. मतदानाच्या दिवशी मतदानाचे कर्तव्य पार पाडत आपण आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली, अशी प्रतिक्रिया संजय दैने यांनी व्यक्त केली.

गडचिरोली ( gadchiroli ) हा आदिवासीबहुल भाग आहे. स्थानिक आदिवासी भाषेतच सगळे व्यवहार चालतात. मात्र, प्रशासनाने स्थानिक भाषेत मतदानविषयी जागृती करत लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. मतदानासाठी येथे नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या, तर नागपूरमध्ये केवळ 54 टक्के मतदान होते.

गोंड भाषेत माहिती

कोटमी परिसर आदिवासीबहुल आहे. येथील वृद्ध मतदारांना मराठी भाषेची माहिती नाही. त्यामुळे मतदान केंद्रावर वृद्ध मतदार गोंधळण्याची भीती होती. मात्र, कोटमी केंद्राचे प्रादेशिक अधिकारी आणि सिरोंचाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सर्व मतदारांना गोंडी भाषेत मशिन आणि व्हीव्हीपॅटची माहिती देत मतदानासाठी प्रोत्साहित केले.

R

Sanjay Daine
MLA Nilesh Lanke News : होय...मी गुंड आहे!'; नीलेश लंके कडाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com