Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत मागितली माफी; 'हे' आहे कारण

Nashik Loksabha : नाशिक लोकसभा मतदार संघाचे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackrey Rally: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (बुधवारी) नाशिकला सभा झाली. ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ठाकरेंच्या आधी आज नाशिकमधील पिंपगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. त्यामध्ये त्यांनी ठाकरेंचे नाव न घेता टीका केली होती. त्याला ठाकरे Uddhav Thackrey काय उत्तर देतात याची उत्सुकता होती. ठाकरेंनी ही आपल्या सभेत मोदींना प्रत्युत्तर देत खुले आव्हान दिले.

Uddhav Thackeray News
PM Modi : 'बाळासाहेब ठाकरेंचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे' ; मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला!

उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये विजयी झाले. ते देशाचे पंतप्रधान झाले. या कालावधीत त्यांनी वाटेल तेवढ्या थापा मारल्या. देशाला मागे नेले. सर्वसामान्यांचे नुकसान केले. या सर्वाला आम्ही देखील जबाबदार आहोत. कारण आम्ही त्यांच्यासाठी मते मागितली होती. त्या एका चुकीसाठी मी सर्वांची माफी मागतो.

'मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचा पुत्र आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिवसेना सोपवली होती. मला जर नकली म्हणत असाल तर मी माझ्या पाच पिढ्यांची वंशावळ घेऊन येतो. माझ्या पंजोबापासून माझ्यापर्यंत आम्ही काय योगदान दिले आहे, ते सांगतो. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या. माझ्यासमोर बसा' असे खुले आव्हान ठाकरे यांनी दिले.

येत्या ४ जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील. येत्या निवडणुकीमध्ये मोदी यांचा दारुण पराभव होणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार देशात सत्तेत येणार आहे. त्यावेळी मोदी यांनी जे जे गैर केले त्याचा हिशेब आम्ही घेऊ. महाराष्ट्राला लुबाडून जे गुजरातला नेले आहे ते महाराष्ट्राचे वैभव पुन्हा राज्याला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो, हा माझा इतिहास आहे, असे ठाकरे म्हणाले.

यावेळी उमेदवार राजाभाऊ वाजे, शिवसेना नेते संजय राऊत, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, शहर प्रमुख विलास शिंदे, दत्ता गायकवाड तसेच महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

Uddhav Thackeray News
Ambadas Danve News : ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचं थेट निवडणूक आयुक्तांना पत्र; म्हणाले,'मोदींच्या सभेसाठी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com