Maharashtra Day : सव्वा वर्षांपासून पालकमंत्री नसलेल्या नाशिकमध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा मान कुणाला? प्रशासनाकडून नाव जाहीर

Nashik Maharashtra Day 2026 flag hoisting : पालकमंत्री नसल्याने महाराष्ट्र दिन सोहळ्याला ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडणार हा प्रश्न होता. अखेर नाव जाहीर करत प्रशासनाने यावर पडदा टाकला.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : गेल्या सव्वा वर्षापासून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त आहे. अशा परिस्थितीत १ मे रोजी महाराष्ट्र दिन सोहळ्याला ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडणार, हा प्रश्‍न कायम होता. अखेर शासनाने या मुद्यावर पडदा टाकत नित्यनियमाप्रमाणे जलसंपदामंत्री महाजन यांनाच ध्वजारोहणाचा मान दिला असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस संचलन मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. जलसंपदामंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी सोहळ्यास विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, इतर मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Girish Mahajan
Girish Mahajan Politics : नाशिक भाजपच्या कारभारात दुसऱ्या गिरीश महाजनांची अधिकृत 'एंट्री' ; स्थानिक नेत्यांची अस्वस्थता डबल

२६ जानेवारी'रोजी मंत्री महाजन यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले होते. परंतु, त्यांनी त्यांच्या भाषणावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळला होता. परिणामी, त्यावरून मोठा वाद निर्माण होऊन मंत्री महाजन तसेच प्रशासनालाही टीकेचे धनी व्हावे लागले होते. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्री महाजन यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दिली होती.

Girish Mahajan
Girish Mahajan Controversy : वाहतूक कोंडीवरून मंत्री महाजनांना भिडणाऱ्या महिलेच्या अडचणीत वाढ; अखेर पहिली तक्रार दाखल...

गिरीश महाजन यांनीही आपल्या चुकीवर खुलासा करताना दिलगिरी व्यक्त केली होती. आता त्या घटनेला तीन महिने पूर्ण झाले. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीचा अनुभव लक्षात घेत १ मेच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी यावेळी सूक्ष्म तयारीवर भर दिला जात आहे. या सोहळ्यात कोणतीही कमी भासणार नाही, यादृष्टीने प्रत्येक बारीकसारीक तयारीवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com