Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांचे महायुतीच्या दिशेने एक पाऊल पुढे, मात्र मध्यरात्रीपर्यंतची खलबते यशस्वी होणार का?

Nashik- Mahayuti- Girish- Mahajan- BJP- NCP- Sameer- Bhujbal- ShivSena- Dada- Bhuse- NMC- Election -मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिक्षणमंत्री दादा भुसे,माजी खासदार समीर भुजबळ यांची जागावाटपाची चर्चा.
Dada-Bhuse-Chhagan-Bhujbal-Girish-Mahajan.
Dada-Bhuse-Chhagan-Bhujbal-Girish-Mahajan.Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News: भाजपकडे १२२ जागांसाठी एक हजाराहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुकीचा आग्रह धरला आहे. मात्र आता या इच्छेला मुरड घातली जाण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेसाठी महायुती करण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या दिशेने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महायुती व्हावी असा आग्रह शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा आहे. महायुती न झाल्यास या दोन्ही पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता होती.

Dada-Bhuse-Chhagan-Bhujbal-Girish-Mahajan.
Sameer Bhujbal : समीर भुजबळांच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा, काकांप्रमाणे पुतण्यालाही येवलेकर स्विकारतील का?

या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीसाठी चर्चा झाली. चर्चेत महायुती करण्यावर एकमत झाल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Dada-Bhuse-Chhagan-Bhujbal-Girish-Mahajan.
Satyajeet Tambe And Amol Khatal : रेल्वे मार्ग बदलला, कट्टर विरोधकांना एकत्र आणलं? तांबे खताळांचा संपर्क वाढला!

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत शिवसेना शिंदे पक्षाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांसह भाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ हे बैठकीला उपस्थित होते. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विविध पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहिले. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती.

मंत्री महाजन यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी समजून घ्याव्या असे त्यांनी सांगितले. महायुतीचे घटक असलेल्या तिन्ही पक्षांचा महायुती बाबत सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यामुळे आता नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा मार्ग सुकर झाला आहे.

येत्या दोन दिवसात महापालिकेतील सध्याचे संख्याबळ आणि विद्यमान नगरसेवक यांचा आढावा घेतला जाईल. अंतर तिन्ही पक्षांकडे किती जागांची अपेक्षा आहे याचा अंदाज व्यक्त होईल. नंतरच प्रत्यक्ष जागावाटप होऊ शकेल. मध्ये शिवसेनेने 45 जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे. ही अपेक्षा पूर्ण करणे भाजपला कितपत शक्य होईल हा चर्चेचा विषय आहे.

महायुती व्हावी यासाठी नेत्यांनी प्रयत्न केले. मंत्री महाजन यांनी याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र इच्छुकांची नाराजी टाळून जागावाटपाचे गणित सोडविणे या नेत्यांपुढे आव्हान आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा विचारात घेऊन चर्चेची पुढची फेरी होण्याची शक्यता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com