Malegaon Municipal Corporation

उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून मालेगावची ओळख आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे 10 लाख असून यात 62 टक्के मतदार मुस्लिम आहेत. पूर्वीपासूनच या महानगरावर काँग्रेसी विचारांचा पगडा दिसून येतो. मालेगाव महापालिकेत 84 जागा आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या होत्या. यामागे काँग्रेसचे नेते आणि दिवंगत माजी आमदार रशीद शेख यांचा प्रभाव कारणीभूत होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल युतीला 26 जागा होत्या. एकत्रित शिवसेनेला 13, भाजपला 9, एमआयएम 7 आणि अपक्ष प्रत्येकी एक जागा मिळाली होती. मागील 9 वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली असली तरीही पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम अशीच निवडणूक इथे होणार हे नक्की आहे.
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com