Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर नाशिकला जरांगेना सर्वपक्षीय पाठींब्याची वज्रमूठ; जिल्हाभर जनजागृती मोहीमेचा निर्धार!

Nashik Maratha Reservation Manoj Jarange Patil All-Party firm support In Nashik-मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले मात्र नाशिकमध्ये समाज एकजुटीचा निर्धार कायम
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilManoj Jarange Patil
Published on
Updated on

Maratha Movement News: मुंबईकडे निघालेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आज मागे घेतले. मात्र या प्रश्नावर शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जरांगेना पाठींब्यासाठी सर्वपक्षीय वज्रमूठ करण्यात आली आहे. 

या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बुधवारी नाशिक रोडला झाली. यावेळी विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षणाच्या प्रश्नावर एकजूट करण्यासाठी जिल्हाभर प्रयत्न केले जाणार आहेत. 

आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पहाटे आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र राज्य शासनाकडून या संदर्भात दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न चिघळला असल्याचा आरोप करण्यात आला. 

Manoj Jarange Patil
Maratha Politics : नाशिकमध्ये मराठा आंदोलनाची धग! आंदोलक आक्रमक; रस्ता रोखला, जोरदार घोषणाबाजी!

राज्य शासनाकडून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आंदोलकांतील एक गट सत्ताधारी पक्षाला सामील झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वेगळी भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचा निषेध करण्यात आला. 

Manoj Jarange Patil
Maharashtra Political Live Update : मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जरंगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन म्हणून जिल्हाभर एकजूट केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात समाजाच्या बैठका घेण्यात येतील. मागण्या संदर्भात समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. 

यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला रामभाऊ जगताप माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे दिनकर आढाव बाळासाहेब मस्के शिवाजी हंडोरे विजय जाधव यांसह विविध नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी वेगळी भूमिका मांडणाऱ्या शिवाजी सहाने यांसह अन्य नेतेही बैठकीत जरांगे यांच्या समर्थनार्थ उतरले होते. 

मराठा आरक्षण हा गरजवंत समाजाचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. राज्य शासनाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून कुणबी दाखले रद्द करण्याची छुपी मोहीम राबविली जात आहे. त्यात युवकांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले तरीही नाशिक जिल्ह्यात मात्र या प्रश्नावर आंदोलन अधिक प्रभावी होण्याची चिन्हे आहेत. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com