Gunratna Sadavarte News: शांतीनगर झोपडपट्टी प्रश्नावर ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर आरोप केले होते. या आंदोलनात तोडगा काढताना आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्योग मंत्री सामंत पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
अंबड येथील गायरान जमिनीवर शांतीनगर झोपडपट्टी होती. ही जमीन एमआयडीसी कडे वर्ग झाली. त्यामुळे एमआयडीसीने या जमिनीवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढून टाकल्याने नवा वाद उभा राहिला
अतिक्रमण कारवाईच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी नाशिक शहरात आंदोलन केले. त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही जागा झोपडपट्टीवासी यांना देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होता.
आंदोलनाबाबत उद्योग मंत्री सामंत यांनी तोडगा सुचविला होता. या चर्चेत प्रशांत खरात हा नेता एकटाच सहभागी झाला. त्यामध्ये आंदोलन मागे घेण्याचा निर्णय परस्पर जाहीर करण्यात आल्याने नवा वाद उभा राहिला आहे. आता आंदोलकांनी खरात याच्यावर अविश्वास व्यक्त करत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
यासंदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या लक्ष्मी ताठे यांनी काही कार्यकर्त्यांसह बंडाचे निशाण उभारले आहे. या नेत्यांनी ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संपर्क केला. आज दुपारी या आंदोलकांची ॲड सदावर्ते यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यात नव्या आंदोलनाची दिशा ठरेल.
प्रशांत खरात यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून तोडगा काढल्याचे कळते. मूळ झोपडपट्टी धारकांना बाजूला सारून मर्जीतील स्वकीय यांना पुनर्वसनाच्या यादीत करणे समाविष्ट केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे श्री. खरात याच्या विरोधकांनी स्थानिक नागरिकांना प्रोत्साहन देत बंडाची घोषणा केली आहे. -----
खरात फॅक्टरमुळे शांतीनगर झोपडपट्टीचे आंदोलन चिघळले आहे. या संदर्भात ॲड सदावर्ते यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उद्योग मंत्र्यांनी सुचविलेल्या तोडगा संशयास्पद असून त्यात झोपडपट्टी वाशी यांची फसवणूक होण्याचा धोका सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे.
हे आंदोलन आता चिघळले असून श्री. खरात आणि स्थानिक महिलांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. या संदर्भात खरात यांनी बोटे छाटण्याची धमकी दिल्याची तक्रार सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. खरात फॅक्टरमुळे शांतीनगर झोपडपट्टी वाशी यांचे आंदोलन आता चांगलेच चिघळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उद्योग मंत्री सामंत यांचा तोडगा बाजूला पडण्याची चिन्हे आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.