Gunaratna Sadawarte: ॲड गुणरत्न सदावर्तेंना आव्हान देणारा मंत्री भेटलाच; थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करण्याचे दिले आव्हान!

Nashik MIDC Slum encroachment removal: Uday Samant responds to Gunaratna Sadavarte's allegations-उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ॲड गुणरत्न सदावर्ते यांना गोंजारत चांगलेच चिमटे काढले, माहिती घेऊन बोलण्याचा दिला सल्ला
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Uday Samant News: कोणावरही बेधडक आरोप करण्यात ॲड गुणरत्न सदावर्ते यांची चर्चा आहे. त्यांच्या सूचनेवरून नाशिकच्या पोलीस ठाण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात ६०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. जमीन घोटाळ्याचा देखील आरोप करण्यात आला. 

ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही वेळ न दवडता तेवढ्याच गांभीर्याने उत्तर दिले आहे. ॲड सदावर्ते यांना गोंजारत गोंजारत त्यांनी चांगलेच चिमटे काढले. आरोप करण्यापूर्वी काय आरोप करतो आहोत, याचे भान आवश्यक असते, असा टोला देखील लगावला. 

नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या शांतीनगर झोपडपट्टीचे अतिक्रमण उद्योग विभागाने काढले. त्यावरून काही कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रशासनाविरोधात आंदोलन झाले. ॲड सदावर्ते यांनी या झोपडपट्टीवासियांची बाजू घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले. 

Uday Samant
Adv Gunaratna Sadavarte: पोलीस यंत्रणा चक्रावली; ॲड सदावर्ते यांच्या आधी मंत्री उदय सामंत यांच्यावर आरोपांच्या फैरी, नंतर पाडला पोलिसांत तक्रारींचा पाऊस!

उद्योगमंत्री सामंत यांनी नाशिक शहरात जमीन घोटाळा केला. झोपडपट्टी वाशी यांची जमीन मोकळी करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग केला. या प्रकरणात दलितांवर अन्याय झाल्याने ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा इशाराही दिला होता. 

Uday Samant
Gunaratna Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांना वॉर्निंग : काय आहे प्रकरण?

पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी सदावर्ते यांनी पुरेशी माहिती न घेताच आरोप केलेले आहेत. सदावर्ते हे आमचे मित्र आहेत. अधून मधून त्यांना माझी आठवण येते. आताही नाशिकमध्ये गेल्यावर आठवण आलेली दिसते. म्हणूनच त्यांनी हे आरोप केले असावेत, असा चिमटा मंत्री सामंत यांनी घेतला. 

संबंधित झोपडपट्टीची जमीन महसूल विभागाने एमआयडीसी कडे हस्तांतरित केली आहे. त्यावर अतिक्रमण असून ते काढून घ्यावे अशी सूचना या विभागाने केली. त्यानुसार एमआयडीसी ने आपल्या अधिकाऱ्याचा वापर करून अतिक्रमण काढले. यामध्ये काहीही गैर झालेले नाही, असा दावा मंत्री सामंत यांनी केला. 

संबंधित झोपडपट्टी धारकांना यापूर्वी अनेक सुविधा आणि पुनर्वसनाचे काम झालेले आहे. १२३८ जणांना यापूर्वी घरे देण्यात आली आहेत. ही घरे योग्य स्थितीत नाहीत असे महापालिका प्रशासनाचे मत आहे. यासंदर्भात संबंधितांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. 

या संदर्भात सदावर्ते यांनी केलेले आरोप सामंत यांनी फेटाळले. मी दलित विरोधी नाही. माझ्या मतदारसंघात उभारण्यात आलेले सामाजिक न्याय भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच अन्य योजना आणि प्रकल्प त्यांनी येऊन पहावे. तसे झाल्यास त्यांचा गैरसमज आपोआप दूर होईल. 

माझ्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप हास्यास्पद आहे. आता मी देखील त्या आरोपाने खरोखर माझी काही जमीन नाशिक मध्ये आहे का याची नक्की माहिती घेईल. सदावर्ते यांनी केवळ आरोप न करता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून माझ्या चौकशीची मागणी करावी, असे आव्हान मंत्री सामंत यांनी सदावर्ते यांना दिले. 

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com