MLC Election : नाशिकसाठी भाजपची वेगळी खेळी ; शिवसेनेला महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन जागा सोडवणार?

Nashik MLC Election, BJP Strategy : नाशिकच्या जागेवरुन गेल्याकाही दिवसांपासून शिवसेना-भाजपत ओढाताण सुरु आहे. शिवसेना जागा सोडायला तयार नसल्याने भाजपने आता वेगळी चाल खेळल्याचे सांगितले जात आहे.
Eknath Shinde | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : विधानपरिषदेच्या नाशिकच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत हा विषय पोहचला आहे. नाशिकमध्ये गेल्यावेळी या जागेवर शिवसेनेचे नरेंद्र दराडे आमदार होते.

मात्र, यावेळी या मतदारसंघात सर्वांधिक संख्याबळ भाजपचे असल्याने भाजपने या जागेवर दावा केला आहे. मात्र, शिवसेना जागा सोडण्यास तयार नसल्याने एखाद्या महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन शिवसेनेच्या ताब्यातून नाशिकची जागा सोडवून घेण्याची तयारी भाजप करत असल्याचे वृत्त आहे.

भाजपने नाशिकसाठी रचलेली ही रणनिती बघता शिवसेना पक्षातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचे घोडे नाशिक व छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून अडले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन जागांबाबत आमची चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. भाजपला नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर यापैकी एक जागा हवी असल्याचे स्वत: फडणवीस यांनीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

परंतु २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत या जागेवर शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून आले होते. त्यामुळे विजयी जागा सोडायची नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे. सध्या, शिवसेनेचे नाशिकमध्ये केवळ दोन आमदार आहेत. अशात ही जागा मिळाल्यास पक्षात तीन आमदार होतील हे गणित शिवसेनेच्या डोक्यात आहे. शिवसेनेत नरेंद्र दराडे, अंजुम कांदे, अजय बोरस्ते, विजय करंजकर, हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी आदी या जागेसाठी इच्छुक आहेत.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
MLC Election : नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे खंदे समर्थक आज अर्ज घेणार, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंची कोंडी

अलिकडेच, शिवसेना (शिंदे गटाच्या) राज्यातील शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात नाशिकमधूनच झाली. तेव्हा पक्षाच्या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील ही जागा याआधी शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेकडेच राहील असे संकेत देत तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, भाजपच्या प्रस्तावाने आता शिवसेनेतील इच्छुकांची धाकधूक वाढल्याचे सांगितले जात आहे.

Eknath Shinde | Devendra Fadnavis
Jalgaon MLC Election: जळगावसाठी गिरीशभाऊ कॉन्फिडंट; इच्छुकांना आता फक्त निरोपाची प्रतीक्षा!

छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेला देऊन नाशिकची जागा भाजपला सोडण्याचा प्रस्ताव मांडला गेल्याचे सूत्रांकडून कळते आहे. सरकारकडून लवकरच महामंडळ वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला नाशिकच्या जागेच्या मोबदल्यात एखाद्या महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात येईल. तसा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान, भाजपकडून इच्छुक असलेले गणेश गिते, निलेश बोरा आज उमेदवारी अर्ज घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडी पाहाता शिवसेनेच्या इच्छुकांची अडचण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com