

Nashik MLC News, 12 Jun : नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोरी निवळली आहे. बंडखोर गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी तीन मंत्री झटत होते. त्यामागील राजकारण आता उघड झाले आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपण प्रचार थांबत असल्याची घोषणा गुरुवारी केली.
त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा जीव भांड्यात पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मोठा दिलासा मिळाला. या संदर्भात आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यामुळे शिवसेनेचे नरेंद्र दराडे पराभूत होण्याची शक्यता होती. त्यामुळे महायुतीचा उमेदवार चुकला यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महायुतीचे उमेदवार दराडे यांचा पराभव झाला असता तर त्याची जबाबदारी माझ्यावर आली असती. त्यावरून भाजप आणि शिवसेना एक शिंदे पक्षात मोठा तणाव निर्माण झाला होता. या राजकीय पदामुळे महायुती अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असते.
मंत्री महाजन यांच्या विधानामुळे या निवडणुकीतील राजकारण स्पष्ट झाले आहे. यामध्ये मंत्री महाजन यांनी स्वतःला सेफ करण्यासाठी माघारीचा यशस्वी केला. त्यामुळे नाशिक विधान परिषदेची निवडणूक आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
यानिमित्ताने भाजपचे नेते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्ती गणेश गीते यांनीही आपली खदखद व्यक्त केली. वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे आमच्या कुटुंबात दरी निर्माण झाली होती. निवडणुकीमुळे कुटुंब विभागण्याचा धोका होता. त्यामुळेच प्रतिष्ठा पणाला लावून भाऊ गोकुळ गीतेला माघार घेण्यासाठी तयार केलं, असं गणेश गीते यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.