Nashik MLC Election : दराडे की गिते कोण येणार निवडून, उद्याची मतमोजणी कशी होणार; किती असेल विजयी मतांचा कोटा?

Nashik MLC Election : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदासंघातील विधानपरिषदेची निवडणुकीची मतमोजणी उद्या केली जाणार आहे. उद्याची मतमोजणी कशी पार पडणार ते पाहूया...
Narendra Darade | Gokul-Gite
Narendra Darade | Gokul-GiteSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : राज्यभरात गाजलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल उद्या सोमवार (दि. २२) जाहीर होणार आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवला होता, मात्र तरीही तात्रिक दृष्ट्या मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते. प्रसाद हिरे यांचेही नाव मतपत्रिकेवर कायम होते. तीन्ही उमेदवारांचे नाव मतपत्रिकेवर कायम असल्याने शेवटर्पंयत सस्पेन्स कायम राहिला.

दरम्यान, एकुण 619 मतदार होते. त्यातील मालेगावचा एक नगरसेवक हज यात्रेला गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी 618 जणांनी मतदान केले. त्यामुळे सध्या तरी विजयासाठीचा कोटा हा 310 मतांचा असून प्रत्यक्ष मतमोजणीवेळी काही मते जर अवैध ठरली तर त्यानुसार हा कोटा बदलू शकतो.

मतदानानंतर सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाकडून उद्याच्या मतमोजणीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पहिल्या पसंतीलाच जर कोटा पूर्ण झाला, तर साधरण दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होऊ शकतो असा अंदाज आहे.

Narendra Darade | Gokul-Gite
Nashik MLC Election : नाशिकच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी धनवर्षाव ; 70 ते 80 कोटींचा चुराडा झाल्याची चर्चा

विजयी मतांचा कोटा कसा ठरतो?

-समजा आपण सर्व 618 मते वैध गृहित धरुया..

-एकुण वैध मते -618 आहेत. त्याचे 50 टक्के म्हणजे 309. त्यात अधिक 1 म्हणजे एकुण 310 होतात. म्हणजे जो उमेदवार 310 मतांचा कोटा पूर्ण करेल जो विजयी होईल.

-परंतु समजा 618 मधील वरची 18 मते अवैध ठरली तर एकूण वैध मते 600 होतात. 600 मतांच्या 50 टक्के म्हणजे 300 त्यात अधिक 1 असा 310 मतांचा कोटा जाहीर करण्यात येईल.

Narendra Darade | Gokul-Gite
Nashik MLC Election : विधानपरिषदेच्या आखाड्यात भुजबळ-दराडे यांचे मनोमिलन, हेच प्रेम विधानसभेपर्यंत कायम राहणार?

4 टेबलांवर मतमोजणी होणार

सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मत मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी 4 टेबलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक टेबलावर प्रथम वैध अन् अवैध मते आधी तपासली जातील. वैध मतांचे 50-50 चे गठ्ठे केले जातील. तीन उमेदवार असल्याने त्यांच्या नावाच्या बॉक्समध्ये प्रथम पसंतीची मते पहिल्या फेरीत टाकली जातील. यानुसार प्रथम फेरीतच प्रथम क्रमांकाचा कोटा पूर्ण झाला तर लगेचच निकाल जाहीर केला जाईल.

परंतु जर कोटा पूर्ण झाला नाही, तर तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला फेरीतून बाहेर केले जाईल, त्याला पडलेल्या मतदानातील दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मते विचारात घेतली जातील. त्याद्वारे कोटा पूर्ण झाला तर लगेचच निकाल जाहीर होईल. थोडक्यात कोटा जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर निकाल लागेल. अन्यथा वेळ लागतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com