Nashik Politics : तिकीट नाकारताच मारली उडी ; १० दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केलेला माजी आमदार आज शिवसेनेत

Former MLA Nitin Bhosale joins Shiv Sena : १० दिवसांपूर्वी मनसेचे माजी आमदार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते शिवसेनेत दाखल झाले.
Nitin Bhosale joins Shiv Sena
Nitin Bhosale joins Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमध्ये नुसता पक्षांतराचा धडाका सुरु आहे. नेते या पक्षातून त्या पक्षात नुसत्या उड्याच मारत आहेत. तिकीट मिळण्याच्या आशेने अवघ्या दहाच दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केलेले माजी आमदार नितीन भोसले यांनी तिकीट नाकारल्याने आज (दि. ६) शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन अवघे दहाच दिवस झाले. मात्र, भाजपने महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांना संधी न दिल्याने त्यांनी भाजपला सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दहाच दिवसात त्यांनी पक्ष बदलल्याचे पाहून नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपने उमेदवारी नाकारलेले माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील या दोघांनीही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचवेळी नितीन भोसले यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली.

Nitin Bhosale joins Shiv Sena
Nashik Politics : नाशिकच्या राजकारणात एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, दोन माजी महापौरांच्या हाती धनुष्यबाण..भाजपलाही धक्का

माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेस नेते शाहू खैरे यांच्या सह नितीन भोसले यांनी २५ डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध करुनही गिरीश महाजन यांनी या सगळ्यांना भाजपत घेतलं. त्यानंतर भाजपने शाहू खैरे यांच्यासह विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली. परंतु नितीन भोसले यांचा पत्ता कट केला. प्रभाग क्रमांक 13 मधून नितीन भोसले यांच्या भावजयी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र, भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने भोसलेंनी 10 दिवसातच भाजपला सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Nitin Bhosale joins Shiv Sena
Nashik BJP : भाजपचे बंडखोर निवडणूक झाल्यावर पुन्हा कमळावर स्वार होणार? पक्षाने कारवाई न केल्याने आश्चर्य..

दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करुनही उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार नितीन भोसले यांनी शाहू खैरे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. नितीन भोसले यांचे म्हणणे झाले की, प्रभाग १३ मध्ये खैरे यांच्यासह पांडे, वाघ व भोसले या चौघांना उमेदवारी मिळेल व चौघांचे पॅनल तयार होईल, असे सांगण्यात आले. परंतु प्रवेशावेळी भाजपच्या यादीत नाव नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर मला धक्का बसला. उमेदवारी देताना भोसले यांचे नाव यादीत नसल्याचे समजल्यानंतर खैरे यांनी घात केल्याचा आरोप माजी आमदार भोसले यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com