Nashik NMC Election : आमची लढाई मित्रपक्ष शिवसेनेशीच, बाकीचे कुठेच नाही.. गिरीश महाजनांनी दंड थोपाटले

Girish Mahajan : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे सगळे पक्ष कुठेच नाही. नाशिकमध्ये आपली खरी लढाई शिवसेनेसोबत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
Girish Mahajan, Eknath Shinde, Dada Bhuse
Girish Mahajan, Eknath Shinde, Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी फार आधीच 'शंभर प्लसचा' नारा दिला होता. त्यामुळे नाशिकमध्ये महायुती होण्याची शक्यता धूसरच होती. आणि तसे झाले देखील. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढत असून भाजपविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आली आहे.

परंतु शिवसेनेसोबत युती का केली नाही हे सांगताना गिरीश महाजन म्हणाले की, युती केली असती तर पक्षाच्या वाट्याला केवळ ५० जागा आल्या असत्या. म्हणून स्वबळावर लढाई लागत आहे. त्यामुळे आपली लढाई इतरांशी नसून, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशीच आहे असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नाशिक महापालिकेत जागांचे शतक ठोकण्यासाठी पक्षातील नव्या-जुन्यांनी एकत्रित येत कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

भाजपने रविवारी (ता. ४) महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. त्यसाठी विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात मंत्री महाजन यांनी प्रथमच शिवसेनेशी युतीबाबत भाष्य केले. शिवसेनेसोबत युती का करता आली नाही याचे कारण त्यांनी सांगितले.

Girish Mahajan, Eknath Shinde, Dada Bhuse
Nashik AB Form Issue : भाजप प्रदेशाध्यक्षांनी नाशिकमधील गोंधळाच्या चुका घेतल्या स्वत:च्या पदरात, महाजनांना घातलं पाठीशी

महाजन म्हणाले, महायुतीत निवडणुकीला सामोरे जाताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीला ७० जागा सोडाव्या लागल्या असत्या, त्यामुळे उर्वरित ५० जागाच भाजपला मिळाल्या असत्या. त्यातून भाजप इच्छुकांचे समाधान करणे अवघड झाले असते. त्यामुळेच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोठेच नसून, आपली लढाई ही मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबरोबरच आहे. त्यामुळे निवडणुकीत 'शंभर प्लसचा नारा सत्यात उतरविण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक महापालिकेत एकुण १२२ जागा आहेत. पक्षनिहाय उमेदवारांचा विचार करता नाशिकमध्ये भाजपने ११८, शिवसेना शिंदे गटाचे १०२, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ४२ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाजन म्हणतात तसे खरी लढत ही शिवसेना-भाजप अशीच होणार आहे.

Girish Mahajan, Eknath Shinde, Dada Bhuse
Nashik AB Form Issue : भाजप प्रदेशाध्यक्षांनी नाशिकमधील गोंधळाच्या चुका घेतल्या स्वत:च्या पदरात, महाजनांना घातलं पाठीशी

दरम्यान महायुतीचा विचार करता मनसेचे ३०, कॉंग्रेसचे २२, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ३१ उमेदवार रिंगणात आहे. याशिवाय वंचितने देखील ५५ उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तसेच रासप २९ व माकप ९ व २१२ इतके उमेदवार नाशिक मनपाच्या निवडणूक रिंगणात उतरले असून निवडणूक लढवणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com