Nashik Politics : नाशिकच्या राजकारणात एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, दोन माजी महापौरांच्या हाती धनुष्यबाण..भाजपलाही धक्का

Former Nashik mayors Dashrath Patil and Ashok Murtadak Join Shivsena : नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील व अशोक मुर्तडक हे दोघेही शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. दोघांनी हाती धनुष्यबाण घेतला आहे.
Eknath Shinde,nashik nmc
Eknath Shinde, nashik nmcSarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipal Election : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये असलेल्या नाशिकच्या दोन माजी महापौरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा भाजपसाठी देखील मोठा धक्का आहे.

माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील या दोघांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हेच या दोघांना पक्षप्रवेशासाठी मुंबईत घेऊन गेले.

अशोक मुर्तडक हे मनसेत असताना महापौर होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर दशरथ पाटील हे शिवसेना एकसंघ असताना महापौर राहिलेले आहेत. महापालिकांसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दोघेही भाजपमध्ये होते. परंतु त्यानंतर आता समीकरणे बदलली असून दोघेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झाले आहेत.

Eknath Shinde,nashik nmc
Nashik BJP : भाजपचे बंडखोर निवडणूक झाल्यावर पुन्हा कमळावर स्वार होणार? पक्षाने कारवाई न केल्याने आश्चर्य..

अशोक मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे ते प्रभाग क्रमांक ५ ड मधून अपक्ष निवडणूक लढवत असून, त्यांना शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी अधिकृत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपचे गुरुमित बग्गा व शिवसेना पुरस्कृत मुर्तडक यांच्यात लढत होणार आहे.

तर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील यांनी यापूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला असून शिंदे सेनेने त्यांना प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रेम पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर दशरथ पाटील हेही शिवसेनेत प्रवेश करतील असा अंदाज होता जो आता खरा ठरला.

Eknath Shinde,nashik nmc
Yeola Municipality : येवल्यात भाजपला दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार का? भुजबळ–फडणवीस चर्चेनंतरही सस्पेन्स कायम

दशरथ पाटील यांनी दीड वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांच्या मुलासाठी उमेदवारीचा शब्द दिला होता असे सांगितले जाते. परंतु, ऐनवेळी दशरत पाटील यांचे बंधू मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दशरथ पाटील यांच्या मुलाचा पत्ता कट झाला. भाजपने प्रभाग क्रमांक ९-ड मधून दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दशरथ पाटील यांनी मुलगा प्रेम पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणत उमेदवारी मिळवली. दशरथ पाटील आणि दिनकर पाटील हे दोघे सख्खे भाऊ असून दोघांचे कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची दोन्ही मुले एकमेकांसमोर उभे आहेत. प्रभाग ९ ड मध्ये दोघेही आमने-सामने आल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

दरम्यान, अशोक मुर्तडक यांनी १२ सप्टेंबर २०१४ ते १५ मार्च २०१७ मनसेत असताना महापौर पद भूषवले. तर दशरथ पाटील यांनी एकसंघ शिवसेनेतेत असताना १५ मार्च २००२ ते १८ फेब्रुवारी २००५ पर्यंत नाशिक महापालिकेचे महापौरपद भूषविले होते. एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या राजकारणात मोठी खेळी करुन दोघांनाही आपल्या गळाला लावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com