Yeola Municipality : येवल्यात भाजपला दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार का? भुजबळ–फडणवीस चर्चेनंतरही सस्पेन्स कायम

Yeola municipal politics : नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी पदभार स्वीकारताच आता पुढे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपला उपनगराध्यक्षपद मिळते का हे पाहावे लागणार आहे.
Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis
Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

संतोष विंचू , येवला

येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीचे वारे वाहू लागले आहेत. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील निवडीच्या सूचना दिल्या असून, १२ जानेवारीला विशेष बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पडद्यामागे राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे.

पालिकेत एकूण २६ नगरसेवक असून, स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागा आहेत. आठ नगरसेवकांमागे एक स्वीकृत पद या निकषानुसार, राष्ट्रवादी व भाजप युतीचे १५ संख्याबळ असल्याने त्यांना दोन, तर शिवसेना (१०) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (२) असे १२ संख्याबळ असल्याने विरोधकांना एक जागा मिळेल. युतीमध्ये राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी एक स्वीकृत पद मिळण्याचे चित्र आहे.

भाजपकडून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक समीर समदडिया यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते प्रमोद सस्कर, आनंद शिंदे, मिननाथ पवार, बडा शिंदे हेही स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादीत प्रवक्ते राजेश भांडगे, हुसेन शेख, दत्ता निकम, विजय खोकले, रवींद्र जगताप, मलिक शेख यांची नावे चर्चेत असून, माजी खासदार समीर भुजबळ व दिलीप खैरे अंतिम निर्णय घेतील.

Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis
Nashik NMC Election : आमची लढाई मित्रपक्ष शिवसेनेशीच, बाकीचे कुठेच नाही.. गिरीश महाजनांनी दंड थोपाटले

शिवसेनेच्या गोटात आमदार किशोर दराडे व युवानेते कुणाल दराडे यांच्या नेतृत्वाखाली हालचाली सुरू आहेत. येथे पराभूतांना एक-एक वर्ष संधी देण्याची चर्चा आहे. यात दयानंद जावळे, विश्वनाथ मोरे, शिवानी वखारे, गणेश ठाकूर, विशाल चंडालिया, संजय कासार, मॉन्टी मथुरे, अजित पवार यांचा समावेश आहे. तसेच रूपेश दराडे किंवा शुभम दराडे यांचीही वर्णी लागू शकते.

भाजपला उपनगराध्यक्षपद?

मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनुसार युतीत उपनगराध्यक्षपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. यात ज्येष्ठतेनुसार छाया क्षीरसागर आणि सर्वाधिक मताधिक्य म्हणून पुष्पा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीने हे पद स्वतःकडे ठेवल्यास मोठी रस्सीखेच पाहायला मिळेल.

Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis
Nashik AB Form Issue : भाजप प्रदेशाध्यक्षांनी नाशिकमधील गोंधळाच्या चुका घेतल्या स्वत:च्या पदरात, महाजनांना घातलं पाठीशी

शिवसेनेत ‘रोटेशन’ की ‘दराडे पॅटर्न’?

शिवसेनेला मिळणाऱ्या एका स्वीकृत जागेसाठी मोठी चुरस आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना प्रत्येकी एक वर्ष संधी देण्याचे ‘रोटेशन’ धोरण राबविले जाते की, नगराध्यक्षपदाची संधी हुकल्याने दराडे कुटुंबातील सदस्याला थेट संधी दिली जाते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

दृष्टिक्षेपात मोर्चबांधणी

१. येवला पालिकेत उपनगराध्यक्ष व स्वीकृतपदासाठी इच्छुकांची जोरदार राजकीय मोर्चेबांधणी.

२. भाजपला उपनगराध्यक्षपद मिळण्याची शक्यता; क्षीरसागर व गायकवाड यांच्या नावाची चर्चा.

३. स्वीकृतच्या तीन जागांपैकी युतीला दोन, तर शिवसेनेला एक जागा.

४. भाजपकडून समीर समदडिया, तर राष्ट्रवादीतून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार फिल्डिंग.

५. शिवसेनेत रोटेशन पद्धत किंवा दराडे कुटुंबातील सदस्याला संधीची शक्यता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com