Election Commission : महापालिकेत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा! 'कायद्यातच 'बिनविरोध'ची तरतूद असल्याचं निवडणूक आयुक्तांनी केलं स्पष्ट

Election Commission Maharashtra : निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचंही विरोधकांकडून बोललं जातं. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ, बिनविरोध निवड तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
State Election Commissioner Dinesh Waghmare addressing media queries on unopposed candidates in Maharashtra municipal elections, dismissing allegations of political pressure.
State Election Commissioner Dinesh Waghmare addressing media queries on unopposed candidates in Maharashtra municipal elections, dismissing allegations of political pressure.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Jan : राज्यभरातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वीच 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे.

निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचंही विरोधकांकडून बोललं जातं. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ, बिनविरोध निवड तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

मात्र, निवडणूक आयोग नियमानुसार काम करीत असून, आयोगावर कुठलाही दबाव नसल्याचे राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सकाळचे विनोद राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. आयोगावर राजकीय दबाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर बोलताना दिनेश वाघमारे म्हणाले की, माझ्यावर कुठलाही प्रकारचा राजकीय दबाव नाही.

State Election Commissioner Dinesh Waghmare addressing media queries on unopposed candidates in Maharashtra municipal elections, dismissing allegations of political pressure.
BMC Election 2026 : CM फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारले; नक्कल करणाऱ्या आदित्य ठाकरेंना काका राज यांचा दाखला देत सुनावलं

शिवाय याचवेळी त्यांना बिनविरोध निवडणुकीबाबत आयोगाची काय प्रक्रिया नेमकी काय असते हे विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'कायद्यातच बिनविरोध निवडणुकीची तरतूद आहे. मात्र एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यास, अर्ज मागे घेतलेल्या इतर उमेदवारांना प्रलोभन, धमक्या मिळाल्यात का किंवा त्यांनी पोलिस तक्रार केली आहे का? याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाकडून अहवाल मागवतो.

आतापर्यंत आलेल्या अहवालात संबंधित उमेदवारांनी स्वतः अर्ज मागे घेतल्याचे स्पष्ट झाले असून अहवालातून खात्री पटल्यावर आम्ही बिनविरोध निवडणूकीला मान्यता देतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'बिनविरोध'मुळे मतदारांचा हक्क डावलला जातोय या आरोपांवर ते म्हणाले, "बिनविरोध निवडणुकीची तरतूद महापालिका अधिनियमातच आहे.

State Election Commissioner Dinesh Waghmare addressing media queries on unopposed candidates in Maharashtra municipal elections, dismissing allegations of political pressure.
Annamalai On Raj Thackeray Challenge : 'मी मुंबईत येणारच… हिंमत असेल तर अडवा!' अण्णामलाईंचं ठाकरेंना थेट आव्हान

कायदे आम्ही तयार करत नाही, तर कायदेमंडळ करते. आयोग या कायद्यांना बांधील आहे. बिनविरोध निवडून येण्याची प्रक्रीया रद्द करायची असेल, तर कायद्यामध्ये सुधारणा करावा लागेल. ते आमच्या हाती नाही. शिवाय बिनविरोध निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

न्यायालयाने अद्याप यासंदर्भात कुठलेही निर्देश दिले नाही. त्यामुळे तोपर्यंत कायद्यातील तरतुदीनुसार आम्हाला त्याचे पालन करावे लागणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ज्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात पोलिस तक्रार नसल्यास ती निवड ग्राह्य मानली जाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com