Nashik NMC : आता नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष विरोधी बाकावर, मनसेचा लय भारी डाव, एकमेव नगरसेविका तरी सत्तेत

MNS Nashik : मनसेच्या निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिवसेना शिंदे गटासोबत शहर विकास आघाडी या नावाने गट नोंदणी केल्याने त्या आता सत्तेचा भाग झाल्या आहेत.
Uddhav Thackeray, Mayuri Pawar, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Mayuri Pawar, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये आज मोठी उलथापालथ झाली. निवडणुकीत भाजपविरोधात मैदानात उतरलेला शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट दोघांनाही भाजपने सत्तेत सहभागी करुन घेतले. महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिंदे गटाकडे देण्यात आलं.

भाजपच्या हिमगौरी आहेर आडके या महापौर झाल्या तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे उपमहापौर झाले. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपने त्यांनाही सत्तेत सहभागी करुन घेतलं आहे. मात्र, नाशिकमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटाला सोबत घेतल्याचा एक मोठा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झाला आहे.

शिवसेना शिंदे गटाला भाजपने सोबत घेतले नसते तर शिंदे गटाला विरोधी पक्षनेतेपद गेलं असतं. मात्र आता नाशिक महापालिकेत सत्तेबाहेर राहिलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना उबाठाचे १५ नगरसेवक निवडून आलेले आहे. त्यामुळे संख्याबळाच्या निकषांनुसार ठाकरे गट हा विरोधी बाकांवर सर्वात मोठा पक्ष ठरतो. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची संधी ठाकरे गटाला चालून आली आहे.

Uddhav Thackeray, Mayuri Pawar, Raj Thackeray
Nashik Mayor Election : नाशिकमध्ये मोठी उलथापालथ, महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके, उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे बिनविरोध

परंतु विशेष हे की, १५ नगरसेवक असलेली शिवसेना उबाठा विरोधी बाकावर बसणार असली तरी एकमेव नगरसेविका असलेली मनसे सत्तेत विराजमान झाली आहे. नाशिक महापालिकेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली. नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी अंकुश पवार या एकमेव नगरसेविका निवडून आल्या आहेत. मात्र त्यांनी ठाकरे गटासोबत न जाता शिवसेना शिंदे गटाची वाट धरली व शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. नाशिक महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे 26 व मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांचा स्वतंत्र शहर विकास आघाडी या नावाने विभागीय आयुक्त नाशिक येथे स्वतंत्र आघाडी म्हणून गट नोंदविण्यात आला. त्यामुळे साहजिकच मयुरी पवार या आता शिंदे गटासोबत सत्तेची फळे चाखणार आहेत.

Uddhav Thackeray, Mayuri Pawar, Raj Thackeray
Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली, बहुमत असूनही केला मोठा त्याग

अंकुश पवार यांच्या निर्णयाने मनसे सत्तेत

नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा भरणार आहे. त्यात विकासकामं होणं गरजेचं आहे. कुंभमेळा आमच्याच प्रभागात भरतो. त्यामुळे विकासकामं झाली पाहिजे हा उद्देश ठेऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मयुरी पवार यांचे पती मनसेचे नेते अंकुश पवार यांनी दिली. अंकुश पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाने मनसे सत्तेचा भाग झाली आहे. याशिवाय अपक्ष निवडून आलेले मुकेश शहाणे यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आपली गट नोंदणी केलेली आहे. त्यामुळे तेही आपोआप सत्तेचा भाग झाले आहे. कारण राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झालेली आहे. भाजपचे ७२ नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे २६, राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक तसेच मनसेचा एक आणि अपक्ष मुकेश शहाणे असे १०४ नगरसेवक सत्तेचा भाग झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com