Nashik Mayor Election : नाशिकमध्ये मोठी उलथापालथ, महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके, उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे बिनविरोध

Himgauri Adke mayor, Vilas Shinde deputy mayor : ऐनेवेळेला भाजपने शिवसेना शिंदे गटाला सत्तेत सहभागी करुन घेत उपमहापौर पद दिले. तर महापौरपदावर हिमगौरी आहेर-आडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Himgauri Adke mayor, Vilas Shinde deputy mayor
Himgauri Adke mayor, Vilas Shinde deputy mayorSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया पार पडली.

नाशिक महापालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांना पक्षाने अर्ज माघारी घ्यायला सांगितला. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया पार पडली.

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. १२२ पैकी ७२ जागा भाजपकडे होत्या. शिवसेना-राष्ट्रवादी भाजपविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे स्पष्ट बहुमत असल्याने आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही अशी भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर भाजप प्रदेश नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयानुसार भाजपने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेतलं आहे. २६ नगरसेवक असलेल्या शिवसेनेला भाजपने उपमहापौर पद दिले तर महापौरपद स्वत:कडे ठेवले.

Himgauri Adke mayor, Vilas Shinde deputy mayor
Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली, बहुमत असूनही केला मोठा त्याग

उपमहापौरपदासाठी सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाच्या प्रवीण तिदमे, विलास शिंदे, राहुल दिवे अशा तिघांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील निर्णयानंतर विलास शिंदे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात भाजपकडून नगरसेवकांना अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. त्यानुसार महापौरपदासाठी हिमगौरी आहेर- आडके, तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

महापौर पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सीमा पवार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अखेरीस निवडणुकीतून सीमा पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे हिमगौरी आहेर आडके यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच उपमहापौरपदासाठीही अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे विलास शिंदे यांची निवडही बिनविरोध झाली.

Himgauri Adke mayor, Vilas Shinde deputy mayor
Nashik Mayor Election : नाशिक महापालिकेत मोठा ट्विस्ट ! भाजप-शिंदे शिवसेना शेवटच्या क्षणाला एकत्र, उपमहापौरपद शिवसेनेला

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचा परिचय

नाव - सौ. हिमगौरी आहेर-आडके

वडील मा. डॉ.श्री. बाळासाहेब आहेर

आई - सौ. शोभना बाळासाहेब आहेर

पती - मा, श्री. अभिजीत आडके

शिक्षण

नाशिकच्या निर्मला कॉन्व्हेंट स्कूल बोर्ड टॉपर, HSC बोर्ड रँकर आणि डिस्टिंक्शन धारक.

पुणे येथील कमिन्समधून B.E.IT अभियांत्रिकीचे शिक्षण.

पुणे येथे मार्केटिंग आणि फायनान्समध्ये PUMBA मधून MBA.

अत्यंत कमी कालावधीत TCS मध्ये Sap - FICO सल्लागार म्हणून पदोन्नती मिळाली.

कार्य

मार्गदर्शक आदरणीय श्री. बाळासाहेब आहेर यांनी श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेची १९९१ मध्ये स्थापना केली. श्रीमती हिमगौरी या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत.

श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेंतर्गत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, मराठी शाळा आणि ज्युनियर कॉलेजसह नाशिकमधील सर्वोत्तम सीबीएसई शाळांपैकी एक जेम्स् इंग्लिश मीडियम स्कूल सह विविध युनिट्स आहेत.

कलेची आवड एकपात्री एकांकिका नाटक स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक पुरस्काराने सन्मानित.

राजकीय

भाजप महिला मोर्चाः- नाशिक शहराध्यक्षपद

विद्यमान नगरसेविकाः- गंगापूर रोड, प्रभाग ०७

इतिहासात नाशिक मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रथम महिला अध्यक्षा म्हणून सार्थ निवड

पुरस्कार

१. आचार्य अत्रे पुरस्कार पुणे २०१८.

२. देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१९.

३. सर्वोत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार नाशिक सिटीझन फोरम २०१९

४. गोदा सन्मान २०२०.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com