Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी वादग्रस्त विधान; नाशिकच्या मविप्र संस्थेतील वाद पोहोचला पोलिसांत

Ajit Pawar controversy, Ashok Pingle News Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमातून सुरु झालेला वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला आहे.
 Ajit Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Ashok Pingle News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम सर्वत्र झाला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मखमलाबाद शाळेतील कार्यक्रम मात्र वादाचा विषय ठरला आहे. त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे.

महाराष्ट्रात 22 जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा कार्यक्रम सर्वत्र झाला. (कै) अजित पवार यांचे खास जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतही तो कार्यक्रम झाला. मखमलाबाद येथील शाळेतील हा कार्यक्रम वेगळ्याच कारणाने वादाचा विषय बनला आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी निकटचे संबंध असलेल्या अशोक उर्फ बाळासाहेब पिंगळे यांचे विधान त्याला कारणीभूत ठरले आहे. ज्या महापुरुषांची किंवा नेत्यांची जयंती असते त्यांच्याविषयी अवमानजनक विधान करण्याची प्रथा नसते. कार्यक्रमात नेमके तेच पडल्याने वाद पेटला.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या बाळासाहेब पिंगळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या विषयी वादग्रस्त विधाने केली. शाळेच्या कार्यक्रमात राजकीय विधाने करताना माजी प्राध्यापक असलेल्या पिंगळे यांचा तोल गेला.

 Ajit Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar Birth Anniversary : अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; दोघांचे जुने फोटो शेअर करत म्हणाल्या, "सगळं सगळं पोरकं झालंय..."

जिल्ह्यातील राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात मविप्र संस्थेचे मोठे योगदान आणि स्थान आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नेत्याचा या संस्थेशी थेट संबंध येतो. त्यामुळेच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यात सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याचे काम श्री पिंगळे यांच्या विधानाने घडले. त्यामुळेच हा मुद्दा सध्या सत्ताधारी गटाच्या विरोधकांनी उचलून धरला आहे.

या संदर्भात विविध ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. समाज माध्यमावर हा विषय चांगलाच गाजला. एवढ्यावर प्रकरण न थांबता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांनी भेट कारवाईची मागणी केली आहे.

 Ajit Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar Birth Anniversary : राज्य सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयापासून शाळा-कॉलेजपर्यंत सर्वत्र होणार अजितदादांची जयंती

संस्थेशी संबंधित शाम मुरकुटे, सतीश शेळके, प्रतीक जाधव, तेजस जाधव, मदन लोखंडे, पवन बोरस्ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्येची देवता सरस्वती यांविषयी अवमान जनक विधाने केल्याने श्री पिंगळे यांच्या विरोधात कारवाई करावी यासाठी त्यांनी पोलिसांकडे आग्रह धरला.

आता हा विषय राजकीय बनल्याने चक्क दोन्ही राष्ट्रवादी पक्षांतच जुगलबंदी सुरू झाली आहे. श्री पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाने आणि समाजातील कार्यकर्त्यांनी दंड थोपटल्याने जिल्ह्यात या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com