

Nashik NCP news: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील आमदारांना पक्ष कमकुवत झाल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार यांच्या पक्षातही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. नाशिकसह राज्यातील महत्त्वाच्या शहरात दुफळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संघटनात्मक डोलारा कमकुवत झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महापालिका निवडणुकीनंतर नाशिक शहरात फारसे कार्यक्रम नाहीत. शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर संघटनात्मक स्थिती बिकट आहे. सत्तेत राहण्याची आणि सत्तेच्या सावलीत फळे चाखण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना जुनी सवय आहे. त्यामुळे सत्य शिवाय पक्ष चालविणे आणि आंदोलने करणे या पक्षाच्या प्रकृतीत नाही. याची जाणीव गेले काही दिवसात सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना होत आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील हे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आहेत. मात्र दुष्काळ, टंचाई, ग्रामीण भागातील समस्या यांबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह अन्य संघटना आक्रमक आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मात्र आक्रमक अथवा सक्रिय नसल्याची कुजबुज सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या पक्षाची स्थिती कमकुवत झाल्याची चर्चा आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नुकतीच शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुरावस्था आणि गैरकारभाराबाबत दौरा केला. मात्र या दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांसह विविध पदाधिकारी दिसले नाही. त्यामुळे नेत्यांकडे त्याबाबत तक्रारी करण्यात आल्या. शहर अध्यक्ष छबू नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दौऱ्याचे नियोजन केले. कुंभमेळा आणि त्यातील गैरव्यवहारांबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा असताना पक्षाचे काही पदाधिकारी याबाबत मौन आहेत.
या गटबाजीची संबंधित नेते आणि प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. दौऱ्यावर आलेल्या नेत्यांनीही त्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. यापुढे जो रस्त्यावर उतरून आंदोलन करील, जनतेसाठी काम करील त्यालाच बळ दिले जाईल असे संबंधित नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सत्तेत आहे. या पक्षाचे आमदार आणि नेते पक्ष कमकुवत होत असल्याची नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यातच शरद पवार गटाकडून पक्षाच्या नेत्यांमध्येच दुफळीचे वातावरण आहे. नाशिकसह राज्याच्या विविध शहरांमध्ये ही गटबाजी उफाळली आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे गंभीर उपाय योजना करीत असल्याचे संकेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.