Satej Patil : 'गोकुळ'वर 4 शासन नियुक्ती सदस्य, मतदानाचाही अधिकार; सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया, 'जनतेने दिलेला कौल...'

Satej Patil Gokul Governmen Members : राज्य सरकारने तीन हजार पेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या सहकारी संस्थांवर चार शासन नियुक्त सदस्य नेमण्यास मंजुरी दिली आहे. तसेच त्यांना मतदान अधिकारही दिला आहे.
Satej Patil
Satej Patil sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satej Patil News : 500 कोटी पेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त सदस्य नेमण्याचा आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा परिणाम गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवर होणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर सतेज पाटील यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, हा निर्णय दुर्देवी आहे. जनतेने दिलेला कौल मान्य करायचा नाही. आपल्याला हवे तेच करायचे. त्यापेक्षा सर्व निवडणूक रद्द करा. आणि शासनाच्या वतीने माणसा नेमा, तेच चालवतील सगळीकडे. सगळे साखर कारखाने, सुतगिरण्या, महापालिका मग निवडणुका घेण्याची गरजच नाही ना मग.

पाटील यांनी स्पष्ट केले की, ते कायदेशीर लढाई लढणार. याविरोधात न्यायालयात जाणार. निवडणूकमध्ये सत्ताधाऱ्यांचा पॅनला आले नाही तर ते याचा वापर होऊ शकतो. शासन नियुक्त मतदान सदस्यांना करण्याचा निर्णय दिला असेल तर ते दुर्देवी आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे संचालक मंडळात समविचारी आघाडीला बहुमत मिळाले असले, तरी अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या १४ संचालकांच्या गणपूर्तीचा पेच निर्माण झाला होता. सतेज पाटील या विरोधात कोर्टात देखील गेले आहेत,

या पार्श्वभूमीवर महायुतीकडून शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे या चर्चेला अधिकृत निर्णयाचे स्वरूप आले आहे.

Satej Patil
Gokul: गोकुळवर 4 शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाची मान्यता; मतदानाचा अधिकारही मिळणार : महायुतीचा सतेज पाटलांच्या बहुमताला धक्का!

सत्तासमीकरणात बदलणार?

गोकुळमध्ये चार शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती झाल्यास संचालक मंडळातील सध्याच्या २५ सदस्यांव्यतिरिक्त चार सदस्यांची भर पडणार आहे. त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने अध्यक्ष निवडीसह महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे निवडणुकीत १३ जागा जिंकलेल्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

Satej Patil
Gokul News: एकीकडे सतेज पाटील - मुश्रीफांची अध्यक्षपदावरुन भांडणं, दुसरीकडे 'गोकुळ'नं शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.