Maharashtra Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, विरोधक सत्ताधाऱ्यांना 'या' मुद्दांवरुन घेरणार

Nagpur Winter Session LIVE Updates: नागपुरात होणारे अधिवेशन अल्पावधीचे ठरणार आहे. अधिवेशन केवळ एकच आठवड्याचे असल्याने राज्याचे कुठले आणि किती प्रश्न मांडले जाणार असा सवाल उपस्थित होत आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी काल (रविवारी) झाला. आजपासून नागपुरात फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. राज्यात कडाक्याची थंडी सुरु असताना राजकारण मात्र तापलं आहे. विधानसभेच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतर आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरु होत आहे.

नागपुरात होणारे अधिवेशन अल्पावधीचे ठरणार आहे. अधिवेशन केवळ एकच आठवड्याचे असल्याने राज्याचे कुठले आणि किती प्रश्न मांडले जाणार असा सवाल उपस्थित होत आहे. आठवडाभरात विदर्भाशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लागणार की नाही, ही चर्चा जोर धरु लागली आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet Expansion : फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात साधलं जातीय समीकरण

विरोधक महायुती सरकारला घेरण्याचा तयारी केली आहे. सोयाबिन, कापूस आणि ईव्हीएम यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडतील, असे सध्याचे चित्र आहे. आज होणाऱ्या अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार आहेत.

रविवारी महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार झाला. एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 33 आमदारांनी कॅबिनेट म्हणून तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक जुन्या चेह-यांना डच्चू देण्यात आला असून अनेक नव्या चेह-यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.

शिंदेच्या शिवसेनेकडून एकूण 11 आमदार मंत्री झाले. त्यामध्ये 5 नव्या चेह-यांचा समावेश करण्यात आला.यामध्ये,संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे.

भाजपकडून मंत्रीमंडळात तब्बल 8 नव्या चेह-यांचा समावेश करण्यात आला आहे. माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, अशोक उईके, संजय सावकारे, आकाश फुंडकर,पंकज भोयर याचा समावेश आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet Expansion News : चंद्रशेखर बावनकुळेंना पहिला मान; तिकीट कापल्यानंतर पाच वर्षांनंतर पुन्हा मंत्री

अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 9 पैकी तब्बल 5 नवे चेहरे देऊन अजितदादांनी अनेक जुन्या मंत्र्यांना डच्चू दिलाय. राष्ट्रवादीच्या नव्या चेह-यांमध्ये माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील, यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com