Nashik Politics : महायुतीने तुटेपर्यंत ताणल्यास दोन्ही बनकर एकत्र येणार? भाजपच्या युवा नेत्यांनी घेतला धसका

Pimpalgaon Baswant election Dilip Banakar & Bhaskarrao Banakar : पिंपळगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सूर जुळतात की नाही यावर निवडणुकीच्या रणसंग्रामाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Dilip Banakar, Bhaskarrao Banakar
Dilip Banakar, Bhaskarrao BanakarSarkarnama
Published on
Updated on

एस डी. आहिरे

Pimpalgaon Baswant election : पिंपळगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडी पाहता न भूतो, न भविष्यती असाच रणसंग्राम रंगण्याची चिन्हे आहेत. परस्परांच्या डावपेचावर मुत्सद्दी नेते लक्ष ठेवून आहेत. महायुती होणार की नाही यावरच पुढील निवडणुकीच्या धुमसानाचे चित्र स्पष्ट होईल. विविध राजकीय पक्ष व आघाड्यांच्या जोर-बैठका सुरू आहेत. बंडखोरांचे मोठे पीक या निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकीय नेत्यांची अन्‌ डावपेचांची पंढरी असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने बोचऱ्या थंडीत माहोल गरम झाला आहे. नव्वद वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या कालावधीत पिंपळगाव शहरावर भास्करराव बनकर यांच्या घराण्याचा तब्बल ३५ वर्ष वरचष्मा राहिला आहे.असे असले तरी त्यांच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येऊन बनकर यांना रोखण्यासाठी व्रजमुठ केलेली दिसते.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर, भाजपचे सतीश मोरे, शिवसेनेचे राजेश पाटील यांच्यासह मविप्रचे उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे, माजी संचालक दिलीप मोरे हे सर्व राजकीय वैर विसरून नगर परिषदेच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आल्याचे सध्याचे चित्र दिसते. तर भास्करराव बनकर हे तानाजी बनकर, सोमनाथ मोरे, चंद्रकांत खोडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन खिंड लढविण्यासाठी सज्ज आहेत.

Dilip Banakar, Bhaskarrao Banakar
Chhagan Bhujbal : येवल्यात भुजबळांच्या विरोधात दराडे बंधूंना शरद पवारांच्या नेत्याची साथ मिळणार? नव्या प्रयोगाची चर्चा रंगात

भास्करराव बनकर यांचा भाजप प्रवेशाबाबतचा उडालेला कल्लोळ आता काहीसा थंडावला आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये काहींनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.आता महायुतीत घडणार की बिघडणार याचीच उत्सुकता सर्वत्र लागून आहे. महायुतीच्या बैठकीच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. पण काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

शिवाय आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या समवेत झालेल्या बैठकीत स्वबळाचा सूर निघाला होता. आमदार दिलीप बनकर यांनीही मेळावा घेत महायुतीची मोट बांधून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला. शिवसेनेचे युवा नेतेही महायुतीलाच अनुकूल आहेत. भास्करराव बनकर यांनी गटाचा मेळावा घेत कुणावर टीकास्त्र न सोडता सर्व ताकदीनिशी निवडणूक लढण्याचा निर्धार केला. पण स्वबळावर की कुणाशी आघाडी हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

Dilip Banakar, Bhaskarrao Banakar
Girish Mahajan : इकडे कांदे तिकडे भुजबळ, संकटमोचक म्हणतात मधला मार्ग काढू, पण कोणता?

महायुतीने तुटेपर्यंत ताणल्यास आमदार बनकर व भास्करराव बनकर यांचा गट एकत्र आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. तशा घडामोडींनी जोर धरला आहे. याचा धसकाही भाजपच्या युवा नेत्यांनी घेतला आहे. त्या मुळे महायुती सूर जुळतात की नाही यानंतरच निवडणुकीच्या रणसंग्रामाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची जत्रा

पिंपळगावला नगराध्यक्षपद हे अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे. असे असले तरी पहिला नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांची जत्राच भरली आहे. महायुतीत नगरसेवकांच्या जागा वाटपाबरोबरच नगराध्यक्षपदावरूनही रस्सीखेच सुरू आहे. डॉ.मनोज बर्डे यांच्या नावाला महायुतीकडून पसंती दिली जात आहे. स्थानिकच्या मुद्यावर महायुतीतील इच्छुकांनी दावेदारी ठोकली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com