Nashik Mayor: फक्त कुंभ नाही, नाशिकचा गेमचेंजर! हिमगौरी आडके यांचा मास्टरप्लॅन; ‘थिंक टॅंक सिटी’ची घोषणा

Nashik NMC Mayor Himgauri Adke BJP Girish Mahajan Kumbh Mela Development-सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाची मोठी संधी म्हणून कामाला सुरुवात केली आहे
Mayor Himgauri-Adke
Mayor Himgauri-AdkeSarkarnama
Published on
Updated on

Himgauri Adke News: भाजपच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. आता त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नाशिकची बलस्थाने त्यांनी सांगितली. आगामी काळात शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आम्ही आव्हान म्हणून स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके शहराच्या महापौर झाल्या आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि अन्य उपक्रमांमुळे त्यांच्याविषयी मोठ्या अपेक्षा आहेत. यानिमित्ताने शहरात अनेक विकासाची कामे होणार आहेत. देशभरातून नागरिक शहराला भेट देतील. याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी नाशिक साठी मोठे प्रकल्प जाहीर केले आहेत. या कामांना सुरुवात देखील झाली आहे. 

Mayor Himgauri-Adke
Narhari Zirwal : धक्कादायक ! मंत्री नरहरी झिरवाळ यांचे मंत्रालयातील कार्यालय सील, अडचणी वाढण्याची चिन्हे; नेमकं काय झालं?

या कामांचा आढावा घेतला असता येत्या वर्षभरात नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे. धार्मिक, औद्योगिक यांसह पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक शहराला विकासाची संधी आहे. या दृष्टीने महापालिका प्रशासन कार्यरत झाले आहे. त्याला अधिक गती देण्याचे काम मी करणार आहे. 

Mayor Himgauri-Adke
HSC Board Exam 2026: बारावीच्या परीक्षा; 'कॉपी'मुळे दादा भुसे संतापले, परिक्षाकेंद्रांसह पालकांनाही धडा शिकवण्याची तयारी!

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच महिंद्रा प्रकल्प विषयी मोठी घोषणा केली होती. प्रकल्पाला स्कॉर्पिओ गाड्यांच्या निर्यातीची मोठी ऑर्डर आहे. शहराला रोजगाराची ही एक संधी आहे. नाशिकमध्ये अशा रोजगारांना प्रोत्साहन द्यावे लागेल.  

सुरत चेन्नई एक्सप्रेस, वाढवण बंदर, ड्रायपोर्ट, नाशिक विमानतळाचा विस्तार, समृद्धी महामार्ग अशा विविध प्रकल्पांमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या बरोबरीने शहराच्या विकासाला संधी आहे. त्यासाठी मूलभूत कामे करण्यावर आमचा भर असेल.

आमच्याकडे सिंहस्थ कुंभमेळा यांसह अनेक मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत. दृष्टीने वेळ कमी आहे. याची जाणीव असल्याने कामाचा वेग आणि वेळेचा जास्तीत जास्त कार्यक्षम उपयोग यावर माझा भर असेल. दृष्टीने शहराच्या नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आणि प्रशासनाला बरोबर घेऊन मी काम करणार, असा निर्धार महापौर आडके यांनी व्यक्त केला. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com