नाशिककरांनो काळजी नको `तो` वटवृक्ष वाचला आहे!

सिडको उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेणार
Aditya Tha at 200 years old banyan tree
Aditya Tha at 200 years old banyan treeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिककरांनो (Nashik) काळजी करू नका वटवृक्ष वाचला आहे, अशी भावनिक साद घालत जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरणमंत्री (Envirnment) आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी दिली आहे.

Aditya Tha at 200 years old banyan tree
प्रविण दरेकरजी, टिका करण्या आधी थोडे शुद्धीत या!

तिडकेनगर येथील उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानभोवती दोनशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाच्या पाहणी प्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. या वेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, कालिका मंदिराचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, म्हसोबा मंदिर समितीचे ट्रस्टी प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.

Aditya Tha at 200 years old banyan tree
निधी वाटपात भाजप व राष्ट्रवादीसह विरोधकांना समान वाटा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थान भोवती असलेला वटवृक्ष हा अंदाजे दोनशे वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. अशा प्राचीन वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने हा महावृक्ष वाचवून उड्डाणपुलाची रचना केली जाईल. तसेच शंभर वर्षांपूर्वीची सर्व झाडे वाचली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करूनच शाश्वत विकास कामांवर भर देण्यात येईल. श्री. ठाकरे म्हणाले की, नाशिक शहरातील इतरही झाडे वाचविण्यासाठी महापालिकेच्या नवीन आराखड्यात नियोजन करण्यात येईल. नंदिनी नदीची संपूर्ण पाहणी करत असताना ते म्हणाले की, औरंगाबादच्या धर्तीवर लोकसहभागातून नंदिनी नदीची स्वच्छता झाल्याची करण्यात येईल.

चर्चेला पूर्णविराम

उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच करून सिडकोतील त्रिमूर्ती चौक व मायक्रो सर्कल येथे प्रस्तावित अडीचशे कोटी रुपयांच्या उड्डाणपुलावरून सुरू असलेल्या वादाला आदित्य ठाकरे यांनी पूर्णविराम दिला. शहराचा शाश्वत विकास महत्त्वाचा असून पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनापूर्वीच गेल्या अडीच महिन्यांपासून या संदर्भात वाद- विवादांना प्रारंभ झालेला आहे. पुलासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या प्रतवारीसाठी महापालिकेने ४४ कोटी रुपये अतिरिक्त मोजण्याची तयारी दाखविली आहे. ४४ कोटी रुपये अतिरिक्त मोजताना पुलाच्या संरचनेत देखील बदल होणार आहे. पर्यावरणप्रेमींनी आदित्य ठाकरे यांना ट्विट करून वृक्ष तोडू नये, अशी विनंती केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वृक्ष तोडला जाणार नाही, अशी घोषणा करत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता. २८) सांयकाळी त्यांनी उंटवाडी येथील दोनशे वर्षांपूर्वीचा जुना वृक्ष असलेल्या जागेला भेट दिली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com