Nashik Police : ..'तर गुड नाईट आमच्या पोलिस ठाण्यातच मिळेल', नाशिक पोलिसांचा टवाळखोरांना आणखी एक इशारा

Nashik Police Commissioner Sandeep Karnik : नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकमधील गुन्हेगार सुतासारखे सरळ केले आहे. आता टवाळखोरांनाही नाशिक पोलिसांनी इशारा दिला आहे.
Sandeep Karnik
Sandeep KarnikSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शहरात दहशत निर्माण करत गुन्हेगारी करणाऱ्यांना नाशिक पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला आहे. नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या टवाळखोरांनाही नाशिक पोलिसांनी 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणायला लावत वठणीवर आणलं. राज्यभरात नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा पॅटर्न सध्या चर्चेत आहे.

Summary

नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांना सूचना

रस्त्याच्या कडेला दारु पिऊ नका

शाळा-कॉलेज परिसरात टवाळकी करु नका

सार्वजनिक ठिकाणी केक कापू नका

आणि रात्री निवासी भागात उपद्रव माजवू नका

नाशिकमध्ये बोकाळलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरु केलेल्या ऑपरेशन क्लीनअप चे नाशिककरांनी स्वागत केले आहे. त्यामुळे गुन्हेगारांची पळता भूई थोडी झाली आहे. अनेक गुन्हेगारी बिळात लपून बसले आहेत. विशेष म्हणजे गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही पोलिसांनी सोडलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:त्यासाठी पोलिस आयुक्तांना फ्री हॅण्ड दिला आहे. त्यामुळे गुन्हेगार कोणीही असो छोटा असो की मोठा कुणालाही सोडणार नाही असा इशाराच पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

नाशिक पोलिसांनी आता टवाळखोरांविरोधातही मोहिम सुरु केली आहे. मागील फक्त २० दिवसांतच ३,६८८ टवाळखोरांवर कारवाई झाली आहे. आम्ही अजूनही अशा टवाळखोरांच्या शोधात आहोत असं पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक पोलिसांनी थेट या कारवाईचे व्हिडीओ बनवून आपल्या सोशल मीडीया प्लॅटफोर्मस् वर शेअर करत टवाळखोरांना ताकीद द्यायला सुरुवात केली आहे.

Sandeep Karnik
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याविषयी 'या' 9 गोष्टी माहिती असल्याच पाहिजे

सर्व टवाळखोरांनो लक्ष द्या… ‘गुड नाईट’ हवी का आमच्या पोलीस ठाण्यात? नको ना…? मग रात्री विना कारण रस्त्यावर फिरू नका, रस्त्यावर केक कापू नका, आणि शाळा-कॉलेज परिसरात टवाळकी करू नका अशी ताकीद नाशिक पोलिसांनी टवाळखोरांना दिली आहे. कायद्यात रहा, नाहीतर…पुढचा नंबर तुमचाही असू शकतो..! असा इशारा टवाळखोरांना दिला जात आहे.

Sandeep Karnik
Nashik Police : फडणवीसांनी फ्री हॅण्ड दिले, आता पोलिस आयुक्त म्हणतात गुन्हेगार छोटा असो की मोठा कुणालाही सोडणार नाही..

नाशिक शहरातील आपल्या परिसरात स्वतःचं नाव प्रसिद्ध करण्यासाठी, प्रभाव वाढवण्यासाठी आणि समाजात दहशत पसरवण्यासाठी ‘इव्हेंट, अभिनंदन, बर्थडे आणि सर्व प्रकारची अवैध बॅनरबाजी’ करणाऱ्या गुन्हेगारांवरही नाशिक पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com