Girish Mahajan Politics : गिरीश महाजनांनी केली माणिकरावांची कोंडी, सिन्नरमध्ये आणून बसवला मर्जितला अधिकारी...

Girish Mahajan : कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी धुरा सांभाळली आहे. त्यासाठी आपल्या मर्जितील अधिकाऱ्यांना नाशिकमध्ये आणण्याची खेळी ते खेळत आहेत. आता त्यांनी माणिकराव कोकाटेंची कोंडी केली आहे.
Girish Mahajan & Manikrao Kokate
Girish Mahajan & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela politics : नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त हजारो कोटी रुपयांची कामे होणार आहेत. ही कामे आपल्याच हातून व्हावीत यासाठी अधिकारीच नव्हे तर मंत्र्यांमध्ये देखील स्पर्धा आहे.

नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी धुरा सांभाळली आहे. त्यासाठी आपल्या मर्जितील अधिकाऱ्यांना नाशिकमध्ये आणण्याची खेळी ते खेळत आहेत. त्यातूनच सत्ताधाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. त्यातच सिन्नर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी अभिजित कदम यांची नियुक्ती करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांना शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कुंभमेळा म्हटल्यावर विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी नाशिक शहरात येईल. कुंभमेळ्यातील ही सर्व कामे आपल्या हातून पार पडावीत, यासाठी सर्वच मंत्र्यांची हालचाल सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली करून आपले प्रभाव क्षेत्र वाढवण्याची चढाओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सिन्नरच्या मुख्याधिकाऱ्यांची नियोजित नियुक्ती चर्चेचा विषय बनली आहे."

Girish Mahajan & Manikrao Kokate
Nashik honey trap scandal: महायुतीच्या विरोधात हनी ट्रॅप चे जाळे काँग्रेस आणि विरोधक सैल होऊ देतील का?...

सिन्नरच्या मुख्याधिकारीपदी कदम यांची निवड जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून झाल्याची चर्चा आहे. याआधी कृषी विभागातील बदल्यांवर मुख्यमंत्र्यांनी थेट नियंत्रण घेतल्याने कोकाटेंची मोठी कोंडी झाली होती. त्यातच आता कदम यांच्या नियुक्तीने भाजपकडून आणि अप्रत्यक्षपणे महाजन यांच्या हस्ते कोकाटेंना पुन्हा एकदा राजकीय झटका बसल्याची चर्चा सिन्नरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Girish Mahajan & Manikrao Kokate
Raj Thackeray : मुंबईतला एक वकील राज ठाकरेंच्या विरोधात थेट गेला सर्वोच्च न्यायालयात, केली मोठी मागणी

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नाशिक कार्यकारी अभियंता पदाच्या खुर्चीला प्रंचड महत्व आहे. तिथेही महाजन यांनी जळगावचे नवनाथ सोनवणे यांची नियुक्ती केली आहे. पंरतु त्यावरुन एकनाथ खडसे विरुद्ध महाजन असा वाद रंगला आहे. तर विद्यमान कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास २३ दिवसांचा अवधी बाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करत मॅट प्राधिकरणाकडे दाद मागितली. त्यामुळे मॅट प्राधिकरणाने या निर्णयाला स्थगिती देत ८ ऑगस्टपर्यंत पालवे यांच्या खूर्चीला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मर्जितील अधिकारी बसवण्याचा हा खटाटोप आता काही लपून राहिलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com