Nashik: नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेत चुरस; स्वीकृत नगरसेवकपदासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचे पारडे जड?

Nashik Politics, Shiv Sena Nashik, Accepted Corporator Post: नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे आणि शिंदे गटातील निष्ठावंतांमध्ये स्पर्धा रंगली आहे. दिलेला शब्द पक्षश्रेष्ठी पाळणार की विसरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Nashik: नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेत चुरस; स्वीकृत नगरसेवकपदासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचे पारडे जड?
sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics: नाशिक शहरात सध्या विधानपरिषद निवडणुकांमुळे नगरसेवकांना चांगलेच महत्व आले आहे. मात्र यावरून एक वेगळेच राजकारण रंगले आहे. भाजपचे वादळ रोखणाऱ्या शिवसेनेच्या निष्ठावंतांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचे हे राजकारण आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने १०० पारचा नारा दिला होता. शहरातील तीनही भाजप आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी त्यासाठी कंबर कसून कामाला लागले होते. मात्र शतक गाठण्यात भाजप यशस्वी झाली नाही.

भाजपच्या काही प्रमुख नेत्यांना देखील नाशिक रोड भागातून महापालिकेत जाता आले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने तो करिष्मा केला. आता दोन्ही शिवसेनेच्या निष्ठावंतांना वेगळीच हुरहूर लागली आहे.

महापालिका निवडणुकीत केलेल्या कामगिरीचे फळ म्हणून स्वीकृत नगरसेवक पद कोणाला मिळणार? यावरून दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्या आहेत. निवडणुकीत उमेदवारी न घेता पक्षासाठी पडेल ते काम केलेल्या या निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवक पदाचा दिलेला शब्द नेते केव्हा पाळणार? याची चर्चा आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शहरात वरिष्ठांचे कोणतेही पाठबळ नसताना १५ जागा मिळाल्या आहेत. यातील दहा जागा नाशिक रोड भागातून मिळाल्या. प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरेंच्या शिवसेनेने प्रतिष्ठा राखली. यामध्ये संपर्क नेते दत्ता गायकवाड यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नाशिक रोड भागात ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना फोडण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे ठाकरेंचे अनेक प्रमुख नेते शिंदेंच्या पक्षात दाखल झाले. त्यासाठी महापालिकेच्या हक्काच्या उमेदवारीवर त्यांना पाणी सोडावे लागले. त्यामध्ये बाबुराव आढाव हे प्रमुख आहेत.

निकाल जाहीर झाल्यावर निष्ठावंतांना न्याय म्हणून स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द देण्यात आला होता. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे हेमंतकुमार गायकवाड आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बाबुराव आढाव या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा आहे.

राजकीय प्रतिष्ठा म्हणून कोण स्वीकृत नगरसेवक होतो याची त्यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण शांत झाले आहे. त्यामुळे या निष्ठावंतांना दिलेला शब्द वरिष्ठ नेते पाळतात की विसरतात हा दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. सध्या कोणत्याच निवडणुका नसल्याने पक्ष या निष्ठावंतांना विसरला तर नाही? ही चर्चा जोरात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com