Satyajeet Tambe : हक्काची रेल्वे मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार ; आमदार सत्यजीत तांबे भूमिकेवर ठाम, खासदार वाजेही उतरले मैदानात

Nashik Pune railway : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजित तांबे यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजेही मैदानात उतरले.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Pune railway : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवत चक्काजाम जनआंदोलन केले.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ मार्गाला प्राधान्य देऊन प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासाशी जोडलेला प्रश्न आहे, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली.

आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, रेल्वेच्या मागणीवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटही झाली.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe : आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, गिरीश महाजनांच्या फोननंतरही आंदोलक आक्रमक

आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनातून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा मुद्दा थेट शासनाच्या केंद्रस्थानी आणला. “हा पक्षाचा विषय नाही, तर जनतेच्या हक्काचा विषय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत आता केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका त्यांनी घेतली.

नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि पुणे या भागांना जोडणाऱ्या सरळ रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe : नाशिकचे 15 आमदार एकीकडे, एकटे सत्यजित तांबे एकीकडे; जिल्ह्याच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न?

पोलिसांनी घेतलं ताब्यात

आमदार सत्यजीत तांबे समर्थकांसह समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यासाठी मार्गक्रमण करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, ते मागे हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतले. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये प्रचंड झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर बळाचा वापर करावा लागला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com