Nashik Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीला वळवल्यावरून राजकारण पेटलं; थोरात विरुद्ध विखे वादाचा नगर पॅटर्न आता थेट रस्त्यावर

Sangamner Route Protest : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाच ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. संगमनेर (हिवरगाव) येथे थोरात आणि खासदार निलेश लंके नाशिक पुणे रेल्वे रास्ता रोको करतील. समृद्धी महामार्गावर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको होईल.
Nashik Pune Railway | Sangamner Route Protest
Nashik Pune Railway | Sangamner Route Protestsarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 09 Aug : नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर चाकणमार्गे व्हावी ही मागणी आहे. त्यात राजकारण आडवे आल्याने हा मार्ग बदलण्याचे प्रयत्न आहेत. त्याला आज लोकप्रतिनिधी थेट आव्हान देणार आहेत. नाशिक पुणे रेल्वे मार्ग प्रक्रिया सुरू असताना अचानक तो शिर्डी मार्गे वळविण्यात आला. त्या विरोधात या भागातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा संताप आज रस्त्यावर उतरणार आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाच ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. संगमनेर (हिवरगाव) येथे थोरात आणि खासदार निलेश लंके नाशिक पुणे रेल्वे रास्ता रोको करतील. समृद्धी महामार्गावर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको होईल.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे, डॉ. अमोल कोल्हे आणि निलेश लंके, माजी आमदार शरद सोनवणे यांसह परिसरातील विविध लोकप्रतिनिधी त्यात सहभागी होती. हे विरोधकांचे शक्ती प्रदर्शन असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nashik Pune Railway | Sangamner Route Protest
Namdev Shastri : महंत नामदेव शास्त्री यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर!

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. आमदार तांबे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तज्ञांची समिती घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आज रास्ता रोको होत आहे.

नाशिक पुणे रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे वळविण्यात मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा थेट संबंध असल्याचा आरोप होत आहे. मंत्री विखे पाटील यांनीही हा मार्ग शिर्डीला नेण्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. त्यामुळे थोरात विरुद्ध विखे या नगर पॅटर्न राजकारणाचे पडसाद आज थेट रस्त्यावर उमटणार आहेत.

Nashik Pune Railway | Sangamner Route Protest
Nashik Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक पुन्हा हादरलं! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, अनेक घरांच्या भिंतींना तडे

हिवरगाव फाटा, समृद्धी महामार्ग, चाकण, नारायणगाव यांसह पाच ठिकाणी आज रास्ता रोको होईल. त्यात लोकप्रतिनिधींचं स्थानिक नागरिकांचा सहभाग असेल. नाशिक पुणे रेल्वे मार्गाचे बहुतांशी काम मार्गी लागले असताना त्यात राजकारण आडवे आले आहे. या राजकारणातून निर्माण झालेला संघर्ष आज थेट रस्त्यावर प्रकट होणार आहे. त्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com