Nashik Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक पुन्हा हादरलं! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, अनेक घरांच्या भिंतींना तडे

Nashik earthquake 4.3 magnitude : जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती. नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी पाडा, मखमलाबाद, मसरूळ आणि गंगापूर रोड परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
Nashik Earthquake | 4.3 Magnitude Tremors
Nashik Earthquake | 4.3 Magnitude TremorsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 09 Aug : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (8 ऑगस्ट) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नाशिक शहरासह ग्रामीण भागातही हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतानाच शनिवारी रात्री प्रथमच शहरातील अनेक भागांमध्येही हादरे जाणवल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती. नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी पाडा, मखमलाबाद, मसरूळ आणि गंगापूर रोड परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले.

दिंडोरी-वणी परिसरातही हादरे

नाशिकच्या दिंडोरी आणि वणी परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. वणी हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत असून, या परिसरात 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

याशिवाय ग्रामीण भागातील कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरापर्यंत काही ठिकाणी भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्क्यांमुळे काही घरांमधील भांडी आणि इतर वस्तू खाली पडल्याच्या घटनाही घडल्या.

Nashik Earthquake | 4.3 Magnitude Tremors
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या पल्लवित झालेल्या आशेवर पाणी; पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 'ती' कृती भोवणार?

काही दिवसांपासून नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रमशाळेच्या भिंतींना यापूर्वी 3.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे भेगा पडल्या होत्या.

Nashik Earthquake | 4.3 Magnitude Tremors
Supriya Sule PC: पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेतच टाकला नवा बॉम्ब; सरकारच्या महत्त्वाच्या विधेयकाला दर्शवला विरोध

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहून सतर्कता बाळगावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com