

Beed News : श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांना अचानक छातीत त्रास जाणवल्यामुळे त्यांच्यावर तातडीने यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उपचारांनंतर त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून, त्यांना अहिल्यानगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
डॉ. सुहास हरदास, डॉ. संदीप गाडे आणि डॉ. महेश घुगे यांच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली महंत शास्त्रीजींवर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय आणि पूर्ण विश्रांतीसाठी ते पुढील काही दिवस रुग्णालयातच वैद्यकीय निगराणीखाली असणार आहेत.
उपचारादरम्यान भाविक आणि हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात येण्याचा आग्रह धरू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात हॉस्पिटल प्रशासन किंवा डॉक्टरांशी भेटीसाठी कोणताही संपर्क करू नये. शास्त्री यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर ते श्रीक्षेत्र भगवानगड येथे सर्वांना भेटणार आहेत.
भेटीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. दरम्यान, शास्त्री यांच्यावर अत्यंत तत्परतेने आणि सेवाभावाने उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे श्रीक्षेत्र भगवानगड व भाविकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.