

Nashik News : गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यावर कोयत्याने व दांडक्याने हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील मंडळ अधिकारी सुनील काकड यांच्यावर हा हल्ला झाला. चिंचोली फाटा परिसरात ६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयितांनी थेट मंडळ अधिकारी काकड यांच्या मानेजवळ कोयता भिरकावला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत दहशत केली. या घटनेत मंडळ अधिकारी अगदी थोडक्यात वाचले.
मंडळ अधिकारी सुनील काकड यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित अमोल भिसे, अतुल भिसे, अर्जुन भिसे व त्यांचे दोन अनोळखी साथीदार अशा पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
चिंचोली फाटा ते मोहगाव रस्त्यावर असलेल्या ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयाजवळ घटना घडली. मंडळ अधिकारी सुनील काकड हे खासगी वाहनाने गस्त घालत असताना मोहदरी शिवारात पुणे-नाशिक मार्गावर मुरूम वाहतूक करणारे अवजड वाहन दिसले. काकड यांनी चालकाला थांबवून रॉयल्टीबाबत विचारणा केली असता चालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगून वाहन पळवले. काकड यांनी त्याचा पाठलाग करून चिंचोली फाटा ते मोह गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयांजवळ वाहन अडवलं. (Nashik News)
चालक अमोल भिसे याने मंडळ अधिकारी काकड यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. अर्जुन आणि अतुल भिसे या दोघांनी काकड यांना पकडून ठेवले आणि लाकडी दांड्याने मारहाण केली. अमोल भिसेने लोखंडी कोयत्याने काकड यांच्या मानेवर वार केला. मात्र काकड यांनी हा वार चुकवून हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यातून काकड सुदैवाने थोडक्यात वाचले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.