Gen Z News: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत आहे. यातील कोणत्याही प्रश्नावर मुख्यमंत्री जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्रश्नांपासून लांब पळण्याची भूमिका मुख्यमंत्री घेत आहेत.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुणे येथे गणेशोत्सवाच्या प्रश्नावर बापट हे सामाजिक कार्यकर्ते भूमिका घेत आहेत. त्यांना मारहाण झाली. त्याबाबत पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचा संदेश जातआहे.
विद्यानंद बापट यांना मारहाण झाली हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला नसल्याचे प्रतीक आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेणे अपेक्षित आहे. त्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांनी गणेशोत्सवाबाबत योग्य भूमिका घ्यावी, असे विधान योग्य नाही.
समृद्धी महामार्गावर दरोडा पडल्याने हा महामार्ग सुरक्षित नसल्याचा संदेश गेला आहे. डीजेचा मुद्दा गंभीर आहे. त्याचे कारण म्हणजे मुंबईत देखील त्याचा वारंवार अनुभव येतो आहे. कायदा सगळीकडे सारखा असायला हवा. पात्र काही मतदारसंघांमध्ये सर्व नियम बाजूला ठेवले जातात.
नाशिकला आदिवासी विद्यार्थ्यांचे अतिशय रास्त मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र प्रदीर्घकाळ त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात मराठा समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. ओबीसी घटक देखील आंदोलन करीत आहेत. धनगर समाजानेही आंदोलनाची घोषणा केली आहे. हे सगळे सरकार जनतेला विश्वास देऊ शकत नाही याचे प्रतीक आहे.
आदिवासी विद्यार्थी अर्थात समाजातील 'जेन झी'आंदोलन करीत आहे. यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार धार्मिक मुद्दे पुढे करून जनतेचे लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न करताना दिसते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुरळीत करण्याऐवजी मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याच्या तयारीत असल्याचा दावाही ठाकरे यांनी केला.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.