Shivaji Park protest : शिवाजी पार्कवर तरुणांचा एल्गार! आदित्य ठाकरेंनी दिला थेट इशारा; म्हणाले,'प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत...'

Political News : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नवी दिल्लीत सीजेपीने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अभिजित दिपके यांनी भाजप सरकारला चांगलेच अडचणीत आणले आहे. विशेषतः महिनाभरापासून सुरु असलेल्या या आंदोलनामुळे दिल्लीसह देश ढवळून निघाला आहे. त्यातच या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत. त्यातच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला.

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने तरुणाई मोठ्या प्रमाणांत रस्त्यावर उतरली आहे. या युवकांनी आंदोलनांत सहभागी होत तिरंगा फडकावला. यावेळी या आंदोलनांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे उपस्थित होते.

Aditya Thackeray
Sanjay Raut Controversy : संजय राऊतांवर सामूहिक नाराजीचा स्फोट? ठाकरेंच्या पक्षाला पदाधिकाऱ्यांचा रामराम; 12 जुलैला शिंदे शिवसेनेत मोठा प्रवेश?

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यासोबतच या विरोधात रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने आंदोलन करीत आहेत. तरुणाईच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. नीट परीक्षेचा मोठा घोळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला.

यावेळी जमलेल्या जनसमुदायास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते तुषार गांधी, शर्मिला ठाकरे, आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भर भाषणातून अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फोनवरूनच युवा पिढीला मार्गदर्शन केले.

Aditya Thackeray
Aditya Thackeray news : आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात; एकनाथ शिंदेंकडून फुलप्रूफ तयारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com