Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्याच्या कामात दिरंगाई; जिल्हाधिकारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात, 6 तासांत फाईल क्लिअर!

Nashik Kumbh Mela land acquisition was delayed for months. Collector Ayush Prasad visited the office on a holiday and cleared the pending file in six hours : नाशिकच्या (Nashik) जिल्हाधिकाऱ्यांनी कामचुकार उपजिल्हाधिकाऱ्याला सुट्टीच्या दिवशी चांगलाच धडा शिकवला. सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट संबंधित कार्यालयात गेले.
Collector Ayush Prasad
Collector Ayush PrasadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ayush Prasad News : नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला आहे. मात्र या प्रकल्पालाही शासकीय अधिकाऱ्यांच्या लालफितीचा फटका बसत आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा वारंवार पुढे आला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम प्राधान्याचे आहे. मात्र अनेक कामे शासकीय विभागाच्या नियमांच्या उंच भिंतींमुळे इंचही पुढे सरकत नाही. साधू ग्रामच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेतही गेले चार महिने असाच ढिसाळपणा झाला होता.

कुंभमेळ्याचे (Kumbh Mela) ध्वजारोहण नुकतेच झाले. ध्वजारोहण म्हणजे कुंभमेळ्याला अधिकृत प्रारंभ झाल्याचा संकेत मानला जातो. मात्र तरीही एका भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्याच्या कामातील ढिसाळपणा कमी झाल्या नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांना द्यावी अशीच आश्वासने संबंधित अधिकारी रोज देत होता. त्यातही काम चार महिने रखडले.

कुंभमेळा मंत्र्यांचा दबाव आणि दुसरीकडे नागरिकांचा पाठपुरावा यामुळे वैतागलेल्या नाशिकच्या (Nashik) जिल्हाधिकाऱ्यांनी कामचुकार उपजिल्हाधिकाऱ्याला सुट्टीच्या दिवशी चांगलाच धडा शिकवला. सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट संबंधित कार्यालयात गेले. कार्यालयात गेल्यावर त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्याला बोलवून घेतले. उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्ची समोर बसून त्यांनी काम पूर्ण करून द्या, असे बजावले. त्यानंतर ते खुर्चीवरच बसून राहिले.

Collector Ayush Prasad
Voter List Fraud : मतदारांची नावे परस्पर गायब! 39 जणांचे पत्ते बदलले; निवडणूक आयोगाने थेट पोलिसांत धाव घेतली!

आताच खुर्चीवर बसून त्यांनी छान पैकी वाचनाचा आनंद लुटला. खुद्द जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हेच समोर बसून आहेत, म्हटल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांचीही चांगलीच फजिती झाली. त्याला नेहमीसारखे खुर्ची सोडून इतरत्र भटकता आले नाही. शेवटी वेगवेगळे नियम आणि माहिती घेऊन त्याने सहा तासात संबंधित फाईल क्लिअर केली.

Collector Ayush Prasad
Ajit Pawar NCP MLAs : शरद पवारांच्या संपर्कात अजितदादांचे 22 ते 26 आमदार? फडणवीस अलर्ट; महायुतीत मोठी खळबळ!

जिल्हाधिकारी महत्त्वाचे काम मार्गी लावण्यासाठी सुट्टीच्या दिवशी स्वतः कार्यालयात आले. आणि कामचुकार उपजिल्हाधिकाऱ्याला समोर किया देत चांगलाच धडा शिकवला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. अर्थात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे वेगळेपण म्हणजे त्यांनी विनम्रपणे काम करून घेतात. मात्र काम चुकार उपजिल्हाधिकाऱ्यांना धडा शिकवत त्याचे नाव मात्र सांगण्यास नकार दिला. हे आणखी एक वेगळेपण ठरले.

एखाद्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सुट्टीच्या दिवशी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून घेऊन धडा देणे हा विरळा प्रसंग. महाराष्ट्रात आणि राज्याच्या इतिहासात असे क्वचितच घडले असावे. ब्रिटिश अथवा अन्य काळ असता तर संबंधित उपजिल्हाधिकाऱ्याला अपमानित करून घरचा रस्ता दाखवला गेला असता. आयुष्य प्रसाद यांनी नम्रपणे गांधीगिरी करत संबंधितांना धडा शिकवला हे विशेष!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.