Nashik News : नाशिकमध्ये SIR मोहिमेदरम्यान बीएलओच्या छातीत कळ, हृदयविकाराचा झटका ; भाजप नगरसेविकेच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

Nashik BLO Heart Attack :मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचे कर्तव्य पार पाडत असताना (बीएलओ) असलेल्या एका कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला.
Nashik BLO Heart Attack
Nashik BLO Heart Attack Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News,BLO Heart Attack : मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेची जबाबदारी पार पाडत असताना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) असलेल्या एका कर्मचाऱ्याला अचानक तीव्र छातीत दुखू लागल्याने हृदयविकाराचा झटका आला.

मात्र, प्रभाग क्रमांक 4 च्या भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतीस धाव घेतल्याने संबंधित कर्मचाऱ्याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.

दरम्यान, डॉक्टरांनी त्वरित अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम सुरू असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांवर नियमित कार्यालयीन कामकाजासोबतच निवडणुकीची अतिरिक्त जबाबदारीही आली आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुणाल कलाल हेही आरटीओमधील दैनंदिन कामकाज सांभाळत बीएलओची जबाबदारी पार पाडत होते.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे लिपिक म्हणून कार्यरत असलेले कुणाल जगन्नाथ कलाल यांच्याकडे सध्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील फुलेनगर परिसरातील राहुलवाडी येथील महापालिका शाळा क्रमांक 56 जवळील केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 14) दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास केंद्रावरील काम सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थता जाणवली. काही क्षणांतच छातीत तीव्र वेदना सुरू झाली व कळ आली.

Nashik BLO Heart Attack
Nashik ZP News : नाशिकमध्ये मोफत गणवेश योजनेत मोठा झोल, CEO ओमकार पवारांकडून 16 मुख्याध्यापकांना नोटिसा.. कारवाईकडे लक्ष

याच दरम्यान केंद्राच्या पाहणीसाठी आलेल्या भाजपच्या नगरसेविका मोनिका हिरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे तसेच अजिंक्य पगारे, सोनू दोंदे आणि बाबा शेख आले होते. कलाल यांची प्रकृती बिघडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कलाल यांना समोरील डॉ. अविनाश पाटील यांच्या दवाखान्यात नेले.

प्राथमिक तपासणीनंतर डॉ. पाटील यांनी हृदयविकाराचा संशय व्यक्त करत तातडीने पंचवटीतील खासगी कार्डियाक केअर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उपस्थितांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तातडीने अँजिओप्लास्टी करून उपचार केले.

Nashik BLO Heart Attack
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात, सरकारवर हल्लाबोल; 'आंदोलकांना लोळवायला...'

उपचारानंतर कलाल यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रसंगावधान राखत वेळेत मदत केल्याबद्दल मोनिका हिरे, शंकर हिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या तत्परतेचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com