Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात, सरकारवर हल्लाबोल; 'आंदोलकांना लोळवायला...'

Raj Thackeray Backs Sonam Wangchuk : दिल्लीत उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना राज ठाकरे यांनी पाठींबा देत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Raj Thackeray attacks government over Sonam Wangchuk protest
Raj Thackeray attacks government over Sonam Wangchuk protestSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political reaction to Sonam Wangchuk protest: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत.

हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? अशी खंत राज ठाकरे यांनी सोशलम मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली आहे.

पुढे त्यांनी म्हटले की, आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत.

मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.

हा विषय सामाजिक...

'माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाही आहे. हा विषय सामाजिक आहे.

NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे.', असे देखील ते म्हणाले.

Raj Thackeray attacks government over Sonam Wangchuk protest
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली! "दोन दिवसांहून अधिक जिवंत राहणं..."; दिल्ली हायकोर्टानं जनहित याचिकेची दखल घेत पाठवली नोटीस

वांगचुक यांचा मुद्दा चुकीची नाही

वांगचुक यांची मागणी अजिबात चुकीची नाही आणि नीट पेपर फुटीचा मुद्दा ज्या दिवशी फुटला त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पण त्याच मागण्या केल्या होत्या. पण खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मिडीयावर अडकायला लागली आहे.

या देशातील सिव्हिल सोसायटीने उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. हे सरकार राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर कदापि कुठल्याही आंदोलनाकडे बघणार पण नाही.

ते कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यांत काहीतरी घातपात आहे असल्या शक्यता पेरत राहणार. कारण या असल्या कुजबुज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर यांच्या सत्तेचा डोलारा टिकला आहे, असा हल्लाबोल ही ठाकरेंनी केला.

मनसे लोकभावनेच्या पाठीशी...

सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवत आहे. फक्त NEET नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेचा पाठीशी आहोत आणि कायम असू देखील.

पण मी नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रीनच्या बाहेर यावं, सजग व्हायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली सर्रास करत आहेत आणि करत राहतील देखील.

पण उद्या तुमच्या आवाजाला, तुमच्यातला संताप, त्रागा हा पण हवा तसा चिरडता येऊ शकतो हा विश्वास या सरकारांना देऊ नका. कारण तसं झालं तर एक काय अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांना लोळवायला हे सरकार कमी करणार नाही, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray attacks government over Sonam Wangchuk protest
Nashik ZP News : नाशिकमध्ये मोफत गणवेश योजनेत मोठा झोल, CEO ओमकार पवारांकडून 16 मुख्याध्यापकांना नोटिसा.. कारवाईकडे लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com