Nida Khan : निदा खानची संसार वाचवण्यासाठी धडपड, पण पती 'त्या' निर्णयावर ठाम, न्यायालयाकडून दुसऱ्यांदा समुपदेशन

Nida Khan and Moin Khan Divorce Case: Second Counselling : नाशिकच्या चर्चित TCS धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या घटस्फोट प्रकरणात दुसऱ्यांदा समुपदेशन झाले.
Nida Khan
Nida KhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik TCS Case : नाशिकमधील TCS धर्मांतर व लैगिंक छळ प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानच्या खासगी आयुष्यात वादळ येऊन ठेपलं आहे. न्यायालयाने दुसऱ्यांदा समुपदेशन करुनही तिचा पती घटस्फोटावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात शुक्रवारी (दि. २०)निदा खान आणि तिचा पती मोईन खान यांच्या घटस्फोट प्रकरणाची दुसरी सुनावणी व समुपदेशन झाले. पतिपत्नीने विभक्त होऊ नये, या उद्देशाने न्यायालयाने दोघांचे समुपदेशन केले. मात्र, निदापासून विभक्त होण्याच्या निर्णयावर मोईन खान ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

नाशिकमधील धर्मांतर प्रकरण समोर आल्यापासून निदा खानच्या कुटुंबात कलह निर्माण झाला आहे. तिचा पती मोईन खान याने घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार न्यायालयाने निदाला समन्स बजावले होते. यापूर्वी १६ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षकारांनी प्रत्यक्ष हजर राहून प्राथमिक समुपदेशनात सहभाग घेतला होता. शुक्रवारी समुपदेशनाचा दुसरा टप्पा पार पडला. यावेळी मोईन खान न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होते, तर गर्भवती निदा खान वैद्यकीय कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाली.

Nida Khan
Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पीए डॉ. रामदास गाडे निलंबित, बेकायदेशीर धाड प्रकरण भोवलं

मिळालेल्या माहितीनुसार निदा खान संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करत असून तिचा पती मात्र घटस्फोट देण्यावर ठाम आहे. या घटस्फोट प्रकरणाची सुनावणी न्यायालयात इन कॅमेरा पद्धतीने घेण्यात आली. समुपदेशनानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १९ जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. त्यावेळी पुढील कार्यवाही होणार असून या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Nida Khan
Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशासन उभारणार 'ही' खास प्रणाली, एक तास आधीच अंदाज येणार

मोईन खान यांच्यातर्फे ॲड. नितीन पंडित, तर निदा खान हिच्यातर्फे ॲड. शोभा ताजनपुरे बाजू मांडत आहेत. धर्मांतर प्रकरणात दाखल गुन्ह्यात निदा खानला कोर्टाने ती गरोदर असल्याने जामीन दिलेला आहे. तिला जामीन देताना कोर्टाने श्रीकृष्ण जन्माचा दाखला दिला होता. मात्र, आता बदनामी आणि ओढावलेल्या नामुष्कीमुळे तिच्या पतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निदा खानच्या वैवाहिक आयुष्यात तणाव वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.