

Minister Narhari Zirwal’s PA Dr. Ramdas Gade Suspended : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तत्कालीन खाजगी सचिव रामदास गाडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. टाकवे गाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील एका कंपनीवर टाकलेल्या बेकायदेशीर धाडप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना दिल्यानंतर रामदास गाडे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालयात साहाय्यक आयुक्त असलेल्या डॉ. रामदास गाडे यांच्या निलंबनाचे आदेश पशुसंवर्धन विभागाने गुरुवारी काढले.
या प्रकरणात गाडे यांची स्वतंत्र फाईल सादर करावी अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्या होत्या. त्यानुसार धाडीच्या प्रकरणाची विस्तृत चौकशी झाली. चौकशीत डॉ. गाडे यांनी क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीर निर्देश दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच कायद्याच्या कसोटीवर न टिकणारी कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
याप्रकरणी गाडे यांचे निलंबन करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. गाडे दोषी असल्याचे सांगणारा व त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्री झिरवाळ यांच्याकडेच गेला होता. तेथून तो मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आला होता. याच प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चार अधिकाऱ्यांनाही ३० ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील टाकवे येथे असणारी सोएक्स इंडिया प्रायव्हेट लि. ही कंपनी विशेष आर्थिक क्षेत्रात ( एसईझेड) मध्ये येते. या कंपनीत हुक्क्यासाठी वापरले जाणारे पदार्थ बनवण्यात येत होते. मात्र, त्याला खाद्यपदार्थ गृहीत धरून अधिकाऱ्यांनी या कंपनीवर कारवाई केली होती.
या कारवाईविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने स्पष्टीकरण मागविले. त्यांनी ज्या वस्तूवर कारवाई केली, ते 'फूड'च्या व्याख्येत येत नाही, असे कळवले. त्यामुळे सरकारला उच्च न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागून अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे शपथपत्र द्यावे लागले. त्यानंतर आता याप्रकरणातील संबधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.