Nashik Crime : नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत घडलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीतील एका अविवाहित तरुणीचे नाव बदलून हानिया ठेवण्यात आलं. तीचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या धर्मातील तत्त्वांनुसार पीडितेच्या बदललेल्या नावाचा वापर करून 'जकात' भरल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आली आहे.
एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या आर्थिक व्यवहारांचे पुरावे व पावती SIT ने जप्त केले आहेत. संशयितांनी पीडित तरुणीकडून जकात भरण्यासाठी 9 हजार रुपये ऑनलाइन उकळल्याचे तपासात समोर आले आहे. संशयितांनी इगतपुरी येथील एका व्यक्तीकडे ९ हजार रुपये जमा केले होते. त्याचा जबाब एसआयटीने नोंदवला.
पीडित तरुणीने संशयितांच्या सांगण्यांनुसार सलग दोन वर्ष रोजे ठेवले होते. ती संशयितांच्या धर्मातील पाचपैकी चार तत्त्वांचे पालन करत असल्याचे पुरावे आहेत. पाचव्या तत्त्वाचे पालन करण्याबाबतही संशयितांचे प्रयत्न सुरू होते तत्पूर्वीच या प्रकरणाचे बिंग फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात कंपनीतील सहकारी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान यांच्याविरुद्ध बलात्कारासह धर्मांतराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वातील पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलेला आहे.
या प्रकरणातील इतर संशयित पकडले गेले होते. मात्र, मुख्य संशयित निदा खान ही तब्बल चाळीस दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. विविध तपास पथके तिच्या मागावर होती. अखेरीस पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 'एमआयएम'चे नगरसेवक मतिन पटेल यांना पोलिसांनी तिला आश्रय दिल्याच्या आरोपाखाली सहसंशयित केलं. त्यानंतर तपासात पुढे घरमालक हानिफ शेख यांनाही सहसंशयित करण्यात आलं.
संशयित दानिशने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तर तौसिफने विनयभंग केल्याचा आरोप आहे. निदा खानने पीडित तरुणींचे ब्रेनवॉश केल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीला निदाला आपल्या धर्मातील पेहरावासह धार्मिक पुस्तके दिली. नमाज पठणाचे धडे दिले. तसेच धर्मगुरूंच्या प्रवचनांचे व्हिडीओ तसेच धर्मांसंदर्भातील अॅप तिच्या फोनमध्ये डाउनलोड करुन दिले. इतकेच नव्हे तर आता संशयितांनी पीडितेच्या बदललेल्या नावाचा वापर करून 'जकात' भरल्याची माहिती SIT च्या तपासात समोर आली आहे.
दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार व निदा खान या तिघांच्या जामिनाबाबत गुरुवारी (दि. २५) न्यायालय निर्णय देणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.