Nashik Kumbh Mela : हजारो झाडांवर कुऱ्हाड.. नाशिकचे तापमान जळगावच्या पातळीवर..आरोप होताच गिरीश महाजनांची धाव

Girish Mahajan inspection Tapovan : पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून वृक्षतोडीला विरोध होत आहे. वृक्षतोडीवरुन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका होत आहे.
Girish Mahajan inspection Tapovan
Girish Mahajan inspection TapovanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये प्रशासनाकडून आगामी कुंभमेळ्याची तयारी सुरु आहे. आगामी कुंभमेळ्यानिमित्त देश- विदेशातील साधू- महंत नाशिक कुंभनगरीत येतील. त्यांच्यासाठी तपोवनात साधूग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र यात आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

तपोवनात १२०० एकर जागेवर साधूग्राम उभारले जाणार आहे. त्यातील ५४ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून ही जागा मोकळी करण्यासाठी येथील झाडांचे सर्वेक्षण करुन १८ हजार झाडांवर महापालिकेने फुली मारली आहे. ही झाडे तोडण्यात येणार असल्याच्या रागातून पर्यावरणप्रेमींनी वृक्ष आंलिंगन आंदोलन सुरु केलं. हे रामा, ही १८ हजार झाडे तुच वाचव, प्रशासनाला सुबुद्धी दे असा संताप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.

शकडो झाडे तोडून नाशिकचे तापमान जळगावच्या पातळीवर नेण्याचा पण राजकीय नेत्यांनी केल्याचा आरोप यावेळी पर्यावरण प्रेमी आंदोलकांनी केला. यानंतर तातडीने कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी तपोवनातील चिन्हांकीत झाडांची पाहणी केली.

Girish Mahajan inspection Tapovan
Jalgaon Elections : नगराध्यक्षपदासाठी कार्यकर्ते बाजूला; जळगावात महाजन-सावकारे-चव्हाण यांच्या ‘होम मिनिस्टर’ रिंगणात

महाजन यावेळी म्हणाले की, निसर्गाचे संगोपन झाले पाहीजे ही आंदोलकांची भूमिका अतिशय योग्य आहे. पण, कुभमेळा हा १२ वर्षातून एकदा येतो. त्याकडे केवळ देशाचे नाही तर अवघ्या जगाचे लक्ष आहे. मागच्यावेळी पेक्षा तिपट्ट-चौपट गर्दी यावेळी होईल. गेल्या अनेक वर्षांपासून तपोवनातील साधूग्रामची परंपरा आहे. साधूग्राम साठीच ही जागा राखील ठेवण्यात आली आहे. त्यामुळे झाडे काढावीच लागतील, त्याशिवाय साधू-महंताची व्यवस्था होऊ शकणार नाही.

या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येतील. ज्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे ते अन्यत्र स्थलांतरीत करण्यात येतील. तसेच एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल, अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Girish Mahajan inspection Tapovan
Unmesh Patil : भाजप ही गांडूळाची...' जळगावमधील उद्धव ठाकरेंचा नेता घराणेशाहीवरुन घसरला..

राज्य शासन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. साधूग्रामच्य जागेतील जुन्या वृक्षांना कोणताही धोका नाही. मागील आराखड्या प्रमाणे आताही कार्यवाही केली जाईल. ते करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच फाशीचा डोंगर, पेठ रोड परिसरात नव्याने रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाईल.

कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि हरित होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. गोदावरी नदी वर्षभर प्रवाहित राहील यासाठी उपाययोजना केल्या जातील. साधूग्राम संपादित जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. तसेच नाशिक शहरात रस्त्यावर मध्यभागी असलेले जीर्ण आणि अपघातांना कारणीभूत वृक्ष काढून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन मंत्री महाजन यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com