Nashik News : नाशिक महापालिकेला NGT चा झटका, नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक ; पर्यावरणप्रेमींच्या याचिकेला मोठं यश

Nashik tree cutting stay : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकासकामे सुरु आहेत. त्यासाठी वृक्ष तोडली जात असताना या वृक्षतोडीप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने मोठा निर्णय दिला आहे
Nashik tree cutting stay
Nashik tree cutting stay file photo
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे केवळ तपोवनच नाही तर शहरातील सर्वच भागातील झाले महापालिकेकडून तोडली जात आहे. झाडे तोडण्याला पर्यावरणप्रेमींनी मात्र कडाडून विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) याचिका दाखल केली होती. पर्यावरण प्रेमींच्या याचिकेला मोठं यश आलं आहे. या याचिकेवर मंगळवार (दि. ७) सुनावणी झाली असता हरित लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. केवळ तपोवन नाही तर शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला लवादाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच यासंदर्भात नाशिक महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत.

हरित लवादाने (National Green Tribunal) दिलेल्या या निर्णयामुळे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तसेच या निर्णयामुळे महापालिका प्रशासनाला २८ एप्रिलपर्यंत नाशिक शहरातील कुठलीही झाडे तोडता येणार नाहीत.

Nashik tree cutting stay
Ashok Kharat expose : मोठा खुलासा! जगासमोर आज येणार अशोक खरातचा विकृत चेहरा; तेजस्वी सातपुते उलगडणार मोठे गुपित!

अश्रू अनावर ....

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात रस्त्यांच्या कामांच्या रुंदीकरणासाठी झाडे तोडली गेली. शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली जुनी झाडे तोडण्यात आली. या झाडांच्या कत्तीलमुळे नागरिक व पर्यावरणप्रेमींना अश्रु अनावर झाले. हा निसर्गवारसा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी झाडावर चढून तसेच झाडाखाली बसून आंदोलन केलं. पण रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी ही झाडे तोडणे क्रमप्राप्त असल्याचं म्हणत बंदोबस्तात झाडे तोडली गेली. नागरिक व वृक्षप्रेमींनी या वृक्षतोडीचा निषेध नोंदवला. स्थानिकांच्या मते, या झाडांमुळे अपघात होत होते आणि अनेकांचा बळी गेला होता. त्यामुळे झाडे हटवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीविरोधात आंदोलन केलं.

दरम्यान, नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल आणि इतर विविध स्वरुपाच्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड प्रस्तावित आहे. मात्र, यात अनेक पुरातन व मोठ-मोठ्या डेरेदार वृक्षांचा समावेश असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महापालिका प्रशासनाकडून वृक्षतोडीची प्रक्रिया राबवली जात असताना, पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप करत काही पर्यावरण संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाकडे धाव घेत याचिका दाखल केली होती.

Nashik tree cutting stay
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स ; अटकेत असलेल्या अधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीवेळी हरित लवादाने नाशिकमधील वृक्षतोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. तसेच २८ एप्रिलपर्यंत कोणतीही नवीन वृक्षतोड करू नये, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच महापालिकेसह संबंधित विभागांना या प्रकरणी आपली बाजू मांडण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com