Ashok Wooike : आदिवासी आंदोलकांचा रोष नको, म्हणून मंत्री उईके पळताय दूर दूर..

Tribal protest : नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेल्या बिऱ्हाड आंदोलनाचा आज शनिवार (ता..१९) अकरावा दिवस आहे. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तर दूरच पण लक्ष देण्यासही आदिवासी मंत्री तयारी नाही.
Trible-Devolopment-Minister-Ashok-Wooike
Trible-Devolopment-Minister-Ashok-WooikeSarkarnama
Published on
Updated on

Ashok Uike : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेल्या बिऱ्हाड आंदोलनाचा आज शनिवार (ता..१९) अकरावा दिवस आहे. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तर दूरच पण त्यावर लक्ष देण्यासही आदिवासी मंत्री तयारी नाही. तर दुसरीकडे बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांची भेट घेत कामगार संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

Summary

राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये १७९१ शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती होणार आहे. त्या विरोधात नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरु आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी कंत्राटी कामगार नेमण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी आदिवासी शिक्षक व कर्मचाऱ्यांना यापुढे सेवेत घेता येणार नाही असं मत्री उईके यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आदिवासींचा रोष चांगलाच वाढला आहे, या रोषाची झळ आपल्याला बसू नये या भीतीने आदिवासी मंत्रीच आता आदिवासींपासून दूर दूर पळत असल्याचं दिसतं आहे.

मंत्री उईके यांनी नाशिक दौऱ्याबाबत सावध पवित्रा घेतल्याचा दिसतो आहे. 'धरती आबा' उपक्रमांतर्गत नाशिकमध्ये नियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द केल्याची आदिवासी मोर्चेकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. मंत्री प्रा. उईके हे दोनपैकी एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Trible-Devolopment-Minister-Ashok-Wooike
Raj Thackeray : मुंबईतला एक वकील राज ठाकरेंच्या विरोधात थेट गेला सर्वोच्च न्यायालयात, केली मोठी मागणी

'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' अंतर्गत शासनाने आदिवासी बांधवांसाठी सेवा पुरवण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत मंत्री उईके यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना मतदान ओळखपत्र, विविध प्रमाणपत्रे आणि शासकीय दाखले वाटप करण्याचे नियोजन आदिवासी विकास विभागाने केले आहे. हा कार्यक्रम येत्या २५ जुलै रोजी (शुक्रवार) नाशिक रोड येथील 'मित्रा' संस्थेच्या कार्यालयात पार पडणार आहे. परंतु या दरम्यान आदिवासी बांधवांचा रोष पत्कारावा लागू नये म्हणून त्यांनी हा कार्यक्रम रद्द करुन तिथे न जाता 'मित्रा' संस्थेच्या कार्यालयात २६ व २७ तारखेला प्रकल्प अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. या कार्यक्रमासाठी आदिवासी विकासमंत्री प्रा. उईके उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Trible-Devolopment-Minister-Ashok-Wooike
BJP Politics : ज्यांनी गद्दारी केली त्यांनाच 'रेड कार्पेट', जळगाव भाजपमध्ये नाराजीचं वादळ

मंत्री अशोक उईके पळ काढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील आमदारांनाही या आंदोलकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्य विधिमंडळांचे अधिवेशन संपले तरी तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलक आता काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. दरम्यान यातील ५० आंदोलकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती. यावेळी शनिवारी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे राज ठाकरेंनी सांगितले होते. त्यानुसार राज ठाकरे हे आज त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा करणार आहेत. त्याकडे आता आंदोलनकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com