

Nashik Trimbakeshwar Kumbh Mela 2027 Important Dates & Schedule : गोदावरीच्या पवित्र तीरावर पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा महासंगम अनुभवायला मिळणार आहे. साधू-महंतांचे आगमन, आखाड्यांचे धर्मध्वजारोहण, शाही मिरवणुका आणि पवित्र अमृतस्नान अशा मंगलमय सोहळ्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. तब्बल 20 महिने 24 दिवस चालणाऱ्या या पर्वातील प्रत्येक धार्मिक विधी, महत्त्वाच्या तारखा आणि अमृतस्नानाचे मुहूर्त यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊया.
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी धर्मध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक प्रारंभ झाला. मुख्य मेळा कालावधी १५ जून २०२७ पासून सुरु होणार आहे. २९ जुलै रोजी नगर प्रदक्षिणा (अमृत स्नानांपूर्वी नाशिकभोवतीची पारंपरिक प्रदक्षिणा) होईल. त्यानंतर २ ऑगस्टला पहिले अमृतस्नान, ३१ ऑगस्टला दुसरे अमृतस्नान तर तिसरे अमृतस्नान नाशिक रामतीर्थ येथे ११ सप्टेंबर व १२ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर होईल. सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता २४ जुलै २०२८ रोजी (दुपारी 3:36) ध्वजावतरणाने, म्हणजे पवित्र ध्वज उतरवून होईल.
कुंभमेळा म्हणजे काय?
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ दर १२ वर्षांनी एकदा, गुरू (बृहस्पती) सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा होतो. वैशिष्ट्यपूर्णपणे “दुहेरी कुंभ” म्हटला जाणारा हा पर्व पवित्र गोदावरीच्या काठी दोन पवित्र स्थळी एकाच वेळी होतो.
अमृतस्नानांचे धार्मिक स्थान
हिंदू धार्मिक परंपरेत कुंभपर्वणीच्या दिवशी पवित्र तीर्थात स्नान, दानधर्म, जप, तप आणि धार्मिक विधी करण्याला महत्त्व आहे. अमृतस्नानाच्या वेळी आखाड्यांच्या साधू-संतांचे स्नान, मिरवणुका आणि संन्यासी परंपरांचे दर्शन हे कुंभमेळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य असते. पौर्णिमा, अमावास्या, एकादशी, तसेच अक्षयतृतीया आणि गंगा दशहरा यांसारख्या पर्वदिवशीही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असते.
अतिमहत्त्वाच्या तारखा
सिंहस्थ महाकुंभमेळ्यात अमृतस्नानाच्या तीन प्रमुख पर्वण्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. पहिले अमृतस्नान सोमवार, २ ऑगस्ट २०२७ ला होणार आहे. ही सोमवती अमावास्येची पर्वणी असेल. दुसरे अमृतस्नान मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ ला, तर तिसरे अमृतस्नान नाशिकमध्ये शनिवार, ११ सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रविवार, १२ सप्टेंबर २०२७ ला नियोजित आहे. नाशिकमधील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ ही या स्नानपर्वण्यांची प्रमुख धार्मिक केंद्रे आहेत.
वेळापत्रक (नाशिक)
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ : शनिवार दि. ३१/१०/२०२६ दुपारी १२:०२ वाजता ठिकाण - रामकुंड, पंचवटी
मुख्य मेळा कालावधी सुरू : १५ जून २०२७ पासून अधिकृत मुख्य मेळा कालावधी सुरू होतो.
साधुग्राम ध्वजारोहण : शनिवार, दि. २४ जुलै २०२७ आखाडा ध्वजारोहण आषाढ कृ. पंचमी
नगर प्रदक्षिणा: गुरुवार, दि. २९ जुलै २०२७ आषाढ कृ. एकादशी
प्रथम अमृतस्नान : सोमवार, दि. २ ऑगस्ट २०२७ आषाढ सोमवती अमावास्या (सूर्यग्रहण)
द्वितीय अमृतस्नान : मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट २०२७ श्रावण अमावास्या
तृतीय अमृतस्नान : शनिवार, दि. ११ सप्टेंबर २०२७ भाद्रपद शुद्ध एकादशी
विशेष पर्वस्त्रान : गुरुवार, दि. १२ ऑगस्ट २०२७ श्रावण शुद्ध एकादशी मंगळवार, दि. १७ ऑगस्ट २०२७ श्रावण शुद्ध पौर्णिमा शनिवार, दि. २८ ऑगस्ट २०२७ श्रावण कृ. एकादशी
वेळापत्रक (त्र्यंबकेश्वर)
सिंहस्थ ध्वजारोहण : शनिवार, दि. ३१/१०/२०२६ आश्विन कृ. ६
प्रथम अमृतस्नान (दर्श अमावास्या, सूर्यग्रहण) : सोमवार, दि. २/०८/२०२७ आषाढ कृ. ३० अमावस्या
द्वितीय अमृतस्नान (मुख्य पर्व) : मंगळवार, दि. ३१/०८/२०२७ श्रावण कृ. ३० अमावस्या
तृतीय अमृतस्नान (वामन द्वादशी) : रविवार, दि. १२/०९/२०२७ भाद्रपद शु. १२
पर्वकाल समाप्ती /सिंहस्थ समारोप : सोमवार, दि. २४/०७/२०२८ श्रावण शु. २
रामतीर्थ, नाशिक - पर्वकाल मुहूर्त
24.07.2027
29.07.2027
02.08.2027
15.08.2027
17.08.2027
28.08.2027
31.08.2027
05.09.2027
11.09.2027
26.09.2027
30.09.2027
11.10.2027
15.10.2027
25.10.2027
10.11.2027
13.11.2027
14.11.2027
24.11.2027
28.11.2027
09.12.2027
27.12.2027
26.01.2028
27.01.2028
28.01.2028
29.01.2028
30.01.2028
31.01.2028
01.02.2028
02.02.2028
03.02.2028
04.02.2028
05.02.2028
06.02.2028
07.02.2028
08.02.2028
10.02.2028
20.02.2028
21.02.2028
25.02.2028
27.02.2028
07.03.2028
21.03.2028
05.04.2028
09.04.2028
24.04.2028
05.05.2028
08.05.2028
20.05.2028
24.05.2028
25.05.2028
26.05.2028
27.05.2028
28.05.2028
29.05.2028
30.05.2028
31.05.2028
01.06.2028
02.06.2028
03.06.2028
07.06.2028
18.06.2028
22.06.2028
02.07.2028
06.07.2028
18.07.2028
रामतीर्थ, नाशिक एकूण अमृतस्नान मुहूर्त : 65
कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर - पर्वकाल मुहूर्त
05.11.2026
06.11.2026
09.11.2026
20.11.2026
23.11.2026
24.11.2026
15.01.2027
19.01.2027
21.01.2027
22.01.2027
03.07.2027
04.07.2027
14.07.2027
18.07.2027
31.07.2027
06.08.2027
09.08.2027
12.08.2027
16.08.2027
17.08.2027
23.08.2027
24.08.2027
28.08.2027
30.08.2027
05.09.2027
15.09.2027
27.09.2027
29.09.2027
14.10.2027
26.10.2027
10.11.2027
13.11.2027
21.03.2028
27.03.2028
03.04.2028
07.04.2028
29.04.2028
01.05.2028
02.07.2028
06.07.2028
21.07.2028
कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर एकूण अमृतस्नान मुहूर्त : 41
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.