Nashik Politics : नाशिक महापालिकेत गुरुवारी ३० एप्रिल रोजी प्रभाग समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. सर्व सहा प्रभाग सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यातही भाजपने बाजी मारली असून नाशिकरोड वगळता पूर्व, पंचवटी, पश्चिम, सिडको व सातपूर समित्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर भाजपसोबत सत्तेत असल्याने नाशिकरोडला भाजपने शिवसेनेला चाल दिल्याने भगवा फडकला.
नाशिकरोड प्रभाग समिती सभापतिपदासाठी शिवसेना (शिंदे गट) तर्फे रमेश धोंगडे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (उबाठा) तर्फे प्रमिला मैंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणूक घेण्याशिवाय पर्याय नव्हता. संपर्कमंत्री रवींद्र मिर्लेकर हे नाशिक दौऱ्यावर असल्याने पुरेसे संख्याबळ नसतानाही शिवसेना उबाठाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते व उपमहापौर विलास शिंदे यांनी उबाठा गटनेता कार्यालयात जाऊन मिर्लेकर यांची भेट घेतली. उबाठाने आपल्या उमेदवाराचा अर्ज माघारी घ्यावा, अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली. मिर्लेकर यांनी शिवसेना शिंदे गटाची विनंती मान्य केली. त्यामुळे मैंद यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे धोंगडे यांचा बिनविरोध सभापतिपद मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला.
फक्त नाशिक पूर्व आणि नाशिकरोड प्रभाग सभापतिपदासाठीच दोन अर्ज होते. नाशिक पूर्वच्या सभापती पदासाठी भाजपच्या मंगला ननावरे व काँग्रेसचे अख्तार जावेद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते, पण काँग्रेसचे जावेद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपच्या मंगला ननावरे यांची बिनविरोध सभापती पदी निवड झाली, तर नाशिकरोडसाठी शिंदेसेनेला जागा सोडली होते. तेथे शिंदेसेनेचे रमेश धोंडगे यांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या उध्दवसेनेच्या प्रमिला मैंद यांनी माघार घेतल्याने धोंडगे बिनविरोध निवडून आले.
असे आहेत सहा प्रभाग सभापती
पूर्व : मंगला नन्नावरे (भाजप)
पश्चिम : सुरेश पाटील (भाजप)
पंचवटी : रोहिणी पिंगळे (भाजप)
सातपूर : समाधान देवरे (भाजप)
सिडको : बाळकृष्ण शिरसाट (भाजप)
नाशिक रोड : रमेश धोंगडे (शिवसेना)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.