Nashik Politics; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या विविध आंदोलने होत आहेत. मात्र यामध्ये अतीउत्साही सवय असलेल्यांकडून तोल ढासळला जातो. असाच गंभीर प्रकार सिडकोच्या विभागीय कार्यालयात झाला.
भारतीय जनता पक्षासह विविध पक्षाच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी सिडकोच्या विभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन केले. कमी दाबाने पाणी येत असल्याने हे आंदोलन झाले. मात्र हे आंदोलन करताना आंदोलकांनी उद्धट आणि असभ्य भाषेसह धमकी दिल्याने हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, हे कारण देत आंदोलक एवढे आक्रमक झाले की, त्यांनी नाशिक महापालिकेच्या सिडको कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी विविध शेलक्या भाषेचा वापर केला. पाणीपुरवठा अधिकाऱ्याला तर कान धरून माफी मागायला लावली. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संताप आणि भीती अशी दुहेरी स्थिती निर्माण झाली होती.
आंदोलकांनी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना अरेरावी करीत अंगावर शाही फेकण्याचा, पेनची शाई टाकण्याचा, काळे फासण्याचा, डोक्यावर माठ फोडण्यात येईल असे विविध इशारे दिले. हातवारे करून असभ्य भाषेचा वापर केला, अशी तक्रार आहे.
हा सर्व प्रकार घडत असताना कार्यालया बाहेर मोठ्या संख्येने कर्मचारी जमले होते. या आंदोलकांनी थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जमिनीवर बैठक मारली. सातत्याने आरडाओरड केल्याने धास्तावलेल्या विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना अक्षरशा रडू कोसळले.
विभागीय अधिकारी कार्यालयातच ढसाढसा रडू लागल्या. एका महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना पाणी देत धीर दिला. मात्र तरीहा आंदोलक अतिशय उर्मट भाषेत त्यांचा पाणउतारा करीत होते. यावेळी पोलिसांना पाचारण करण्याचा विषय निघाल्यावर आंदोलक निघून गेले.
पाण्याच्या मागणीसाठी झालेले आंदोलन आंदोलकांचा तोल ढासळल्याने वेगळ्याच दिशेला गेले. त्यामुळे हे आंदोलन चांगले चर्चेचा विषय ठरले आहे. विभागीय अधिकारी यासंदर्भात आज आयुक्तांची भेट घेणार आहेत. संबंधित आंदोलकांवर पोलीस कारवाई करण्याची परवानगी आयुक्तांकडे मागणार आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन वेगळेच दिशेला जाण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका छाया देवांग जानी, सुधाकर जाधव, अंकुश वराडे, प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील, अजिंक्य गीते, सुबोध नागपुरे, देवचंद केदारे, राहुल गनोरे, दिलीप देवांग, विशाल डोके, योगेश कातकडे आदी आंदोलनात सहभागी होते.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.