Malegaon Politics; ‘एमआयएम’चे आमदार मौलाना यांना नागरिकांनी मध्यरात्री झोपेतून जागे केले, सुनावले खडे बोल!

MIM Maulana Mufti;A crowd gathered at midnight, MLA Mukti was woken up from his sleep and asked for an answer-रस्त्याच्या निकृष्ट कामाला आमदार मौलाना मुक्ती यांचे संरक्षण असल्याने नागरिक संतापले.
Crowd at out side MLA Maulana Mufti house
Crowd at out side MLA Maulana Mufti houseSarkarnama
Published on
Updated on

MIM Maulana Mufti News: मालेगाव शहर आणि तेथील नागरिकांची कार्यशैली वेगळीच आहे. येथे उन्हाळ्यात रात्री दिवस उजाडतो अशी स्थिती असते. त्यामुळे येथील नागरिक मध्यरात्री जास्तच राजकीय चर्चेत रंगतात. असाच एक ताजा प्रकार चर्चेत आहे.

मालेगाव शहरातील नयापुरा हा ‘एमआयएम’ पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती यांचा परिसर मानला जातो. येथील बहुतांशी नागरिक त्यांचे पाठीराखे असल्याचे मतदानातून दिसते. मात्र सोमवारी रात्री याच नागरिकांनी मौलाना मुफ्ती यांची झोपमोड करीत खडबडून जागे केले.

Crowd at out side MLA Maulana Mufti house
Maharashtra Politics: अजित दादांनी नाड्या आवळल्या ; मंत्री अस्वस्थ, कामे ठप्प, कंत्राटदार रस्त्यावर...

नयापुरा येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. हे काम मौलाना मुफ्ती यांच्या आमदार निधीतून होणार आहे. मात्र त्याचे काम अत्यंत निकृष्ट आणि कोणत्याही तांत्रिक बाबी न करता होत आहे. अतिशय निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने मालेगावचे नागरिक संतापले आहेत.

Crowd at out side MLA Maulana Mufti house
Dr. Anand Pawar: जिल्हा रुग्णालय वाद, तक्रार करणारा डॉक्टरच निघाला चक्क खंडणीखोर!

या संदर्भात माहिती अधिकार वापरून काही नागरिकांनी याबाबत माहिती विचारली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राट दाराने संबंधितांविषयी थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी संबंधितांना चार तास विचारपूस करीत बसवून ठेवले. त्याची तीव्र प्रतिक्रिया नयापुरा भागातील नागरिकांमध्ये उमटली.

नागरिक मध्यरात्री या विषयावर चर्चा करत असताना जमू लागले. यावेळी शेकडो नागरिक एकत्र आले. त्यांनी मध्यरात्री आमदार मौलाना मुफ्ती यांना दूरध्वनी केले. यावेळी आमदार मुक्ती झोपेत असल्याने त्यांनी हे फोन उचलले नाहीत.

मात्र कार्यकर्तेही तेवढ्याच जोशाने फोन करीत राहिले. अखेर आमदार मौलना मुफ्ती यांची झोपमोड झाली. त्यांनी फोन घेतल्यावर या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालण्याबाबत त्यांना जाब विचारला. याबाबत मतदार नाराज आहेत. आत्ताच्या आत्ता घटनास्थळी या, असा इशारा त्यांना दिला.

आमदार मौलाना यांनी मात्र उद्या सकाळी बोलू या, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यात राजकीय कार्यकर्त्यांची ही भर पडली. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. मध्यरात्री आमदार मौलाना मुफ्ती यांच्या निवासस्थानाबाहेरच हा सगळा राजकीय ड्रामा घडल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

शहरातील स्थानिक पत्रकारांनी त्याचे शूटिंग केले. ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे आधीच बांगलादेशी नागरिकांमुळे संतप्त असलेल्या मालेगावच्या नागरिकांमध्ये आमदार मौलाना मुफ्ती यांच्या विषयी अधिकच संताप निर्माण झाला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com