
Nashik Rickshaw Issue : नाशिक शहरात रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील एका रिक्षा चालकाच्या मुजोरपणा संपूर्ण राज्याने पाहिला. रिक्षाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरुन रिक्षा चालकाने चारीचाकी गाडीला रिक्षा आडवी करुन लावली आणि गाडी चालवणाऱ्या तरुणाला शिव्या देत गाडीतून खाली खेचत मारहाण केली. रिक्षा चालकांच्या झुंडशाहीचा हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून रिक्षाचालकाला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नाशिक शहरातील रिक्षाचालकांचा मुजोरपणा काही कमी झालेला दिसत नाही.
एका रिक्षाचालकाने तर आता हद्दच पार केली. द्वारका परिसरात रिक्षाचालकाने रात्री रस्त्याने जाणाऱ्या महिलेला पाहून अश्लील हावभाव तर केलेच शिवाय स्वत:च्या अंगावरील कपडे काढून महिलेसमोर तो अर्धनग्न झाल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. त्याच रिक्षाचालकाने त्याच रात्री द्वारका येथे सिटीलिंक बसचालक व वाहकाला शिविगाळ केली. त्यानंतर बसवर दगडफेकही केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रिक्षाचालक व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून तो भद्रकाली परिसरात राहतो. संशयिताची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे.
महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटलं आहे की, गुरुवारी (ता. १०) रात्री साडेदहा वाजेची ही घटना आहे. त्यावेळी महिला द्वारकेकडे येत होत्या. त्याचवेळी संशयित रिक्षाचालक व त्याचा साथीदार हेही महिलेच्या मागे पाठलाग करत आले. महिलेला अडवून तुमको किधिर जाना है असं विचारत अश्लिल हावभाव केले. महिला घाबरल्याने पुढे चालू लागल्या संशयित रिक्षाचालकाने त्यांना पुन्हा अडवून अंगावरचे कपडे काढून अर्धनग्न होत अश्लिल हावभाव केले. तसेच तुझे छोडूंगा नही अशी धमकी महिलेला दिली. त्यानंतर महिलेने तेथून कसाबसा पळ काढला व घर गाठलं. रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
आधीच नाशिक शहर रिक्षा चालकांच्या नियमबाह्य वाहतुकीने त्रस्त होते. त्यात रिक्षाचालकांच्या अशाप्रकारच्या वाढत्या मुजोरीच्या घटनांमुळे नाशिक शहरातील नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुजोर रिक्षाचालकांनी एकप्रकारे पोलिसांसमोर आव्हानच निर्माण केले आहे. त्यामुळे पोलीस आहेत कुठे? पोलिसांचा धाक रिक्षाचालकांना आहे की नाही असा प्रश्न सर्वसामन्य विचारत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.