Nashik ZP : नाशिक जिल्हा परिषदेची ई-गव्हर्नन्समध्ये भरारी; CEO ओमकार पवारांचा CM फडणवीसांच्या हस्ते सन्मान

Nashik Zilla Parishad e-Governance : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नाशिक जिल्हापरिषदेने राज्यात पाचवा क्रंमाक पटकावला. सीईओ ओमकार पवार यांचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला.
Nashik ZP
CEO Omkar Pawar being felicitated by CM Devendra Fadnavis for Nashik Zilla Parishad’s achievement in e-Governance.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावत पाचवा क्रमांक पटाकवल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेनचा शासकीय कामकाजात वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणालीचा (GIS) प्रभावी वापर अशा सात महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता. या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेने एकूण १६५.७५ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला होता.

Nashik ZP
Ajit Pawar News: नियतीचा खेळ..! एकीकडे अजितदादांच्या मृत्यूला दोन महिने पूर्ण, त्याचदिवशी पुणे झेडपी राज्यात ठरली 'नंबर वन'

नाशिक जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांमुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढली असून कामकाज अधिक वेगवान व सुलभ झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना अधिक जलद, सुलभ व परिणामकारक सेवा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Nashik ZP
Ashok Kharat : अशोक खरात सारखे भोंदूबाबांचे अड्डे कोकणात? शिंदेंच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात 'भोंदूगिरी'वर बोट!

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा केवळ स्पर्धा नसून प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि लोकाभिमुख करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. नाशिक जिल्हा परिषदेमधील सर्व विभागप्रमुख, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा गौरव आहे. भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी प्रतिक्रिया सन्मान स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com